ज्येष्ठ नागरिक म्हणजे निवृत्त नागरिक नव्हे.
निवृत्तीनंतर सुद्धा प्रकृती ठणठणीत असेपर्यंत कामात राहा. वेगळ्या पद्धतीत नोकरी अथवा व्यवसाय काय करता येऊ शकेल असा विचार करा. आज पुष्कळ कंपन्यांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसाचे शिबीर घेतले जाते. त्यामध्ये तुमचे शिक्षण, अनुभव, स्वभाव यानुसार निवृत्तिपश्चात तुम्ही कोणत्या स्वरूपात नोकरी अथवा व्यवसाय करू शकता याचे मार्गदर्शन केले जाते. आज डॉक्टर, वकील यांच्यासारखे प्रोफेशनल आपले निवृत्तीचे वय कितीही पुढे नेऊ शकतात.
मी स्वतः २०१३ साली शासकीय नोकरीतून निवृत्त झालो त्यावेळी “तरुण भारत ” तीन रुपयांना मिळायचा , gas सिलिंडर दोनशे रुपयांना मिळायचा , पेट्रोल ५० रुपये लिटर होते आज ह्या सर्वांच्या किमती दुपातीपेक्सः जास्त आहेत याचाच अर्थ माझे हे unavoidavle खर्च पाच वर्षातच दुप्पटीहून जास्त झाले आहेत !!
त्यामुळे कामातून निवृत्ती घेण्यापूर्वी आपल्या यापुढील १५ वर्षांच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक रक्कम आपल्याकडे आहे का ? याचा विचार सर्वप्रथम करावा ही अपेक्षा !! आणि त्याचबरोबर जी गुंतवणूक करणार ती सुरक्षित प्रकारात करण्यसाठी योग्य अर्थासाल्लागाराचा सल्ला घेण्यासही विसरू नका !!
जास्त व्याज देणाऱ्या योजना काही वेळा मुद्दलाच खाऊन जातात हे लक्षात घेता SWP हा पर्याय कसा आहे हे तज्ञ मंडळीना विचारावे व त्यात गुंतवणूक करा हाच महत्वाचा सल्ला !!
आणि या सर्वाबरोबर एक मोठी family mediclaim policy घेण्यासही विसरू नका !!