आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाने आपला नवा आदित्य बिर्ला सन लाईफ ‘रिटायरमेंट फंड’ बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील फंड असून रिटायरमेंट सोल्यूशन ओरिएंटेट फंड आहे. या फंडासाठीचा लॉक इन पिरियड हा किमान पाच वर्ष किंवा रिटायरमेंट यातील जे आधी असेल ते असणार आहे. गुंतवणूकदारांना आपल्या वयानुरुप रिटायरमेंटचे नियोजन करता येणार असून चार प्रकारच्या जोखमीचे पर्याय यात देण्यात आले आहे. 
 
‘आदित्य बिर्ला सन लाईफ ‘रिटायरमेंट फंड’द्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करता येणार असून वयाच्या तिशीतच निवृत्तीनंतरचे नियोजन करता येणार आहे.
 
या फंडात गुंतवणूकीसाठी चार पर्याय देण्यात आले आहेत. तिशीच्या प्लॅनमध्ये 80-100 टक्के गुंतवणूक इक्विटी प्रकारात आणि डेट आणि मनी मार्केट प्रकारात केली जाणार आहे. तर चाळीशीच्या प्लॅनमध्ये 65-80 टक्के इक्विटी आणि उर्वरित डेट प्रकारात गुंतवणूक केली जाणार आहे. पन्नाशीच्या प्लॅनमध्ये डेट प्रकारात 75-100 टक्के गुंतवणूक केली जाणार आहे. पन्नासपेक्षा जास्त वयोगटातील गुंतवणूकदारांसाठी 100 टक्के डेट प्रकारातील गुंतवणूकीचा पर्याय देण्यात येणार आहे. या फंडाचे नियोजन अजय गर्ग आणि प्रणय सिन्हा करणार असून या फंडासाठी कोणताही एक्झिट लोड आकारण्यात येणार नाही.

अभिप्राय द्या!