पुढील आर्थिक वर्षामध्ये सरकारी बँकांचा ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) दाखल करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. पुढील आर्थिक वर्षात सरकारी बँकांच्या इक्विटी भांडवलासंबंधी ईटीएफ खुला करण्याची सरकारची योजना आहे.
सरकारने यापूर्वीच भारत २२ व सीपीएसई हे दोन ईटीएफ दाखल केले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दोन ईटीएफमधून सरकारने अनुक्रमे ३२,९०० कोटी व २८,५०० कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. केंद्र सरकारचे सरकारी बँकांमध्ये किमान ५८ ते कमाल ८७ टक्के भांडवल आहे.