देशातील कोट्यवधी लोकांना फायदा मिळवून देणारे पाऊल उचलत कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफवर ( प्रॉव्हिडंट फंड) व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार 2018-19 या वर्षासाठी सध्याचा 8.55 टक्के असलेला व्याजदर वाढवून तो 8.65 टक्के इतका करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केल्यानांतर याचा देशातील सहा कोटी सदस्यांना फायदा मिळणार आहे.   आर्थिक वर्ष 2016 नंतर प्रथमच  वाढ करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या!