गेल्या दोन महिन्यातील अस्थिरतेनंतर नवीन वर्षात गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा  इक्विटी फंडामध्ये मोर्चा वळवला असून आपल्याकडील अतिरिक्त पैसा बाजारात गुंतवत आहेत, असे मत निधी व्यवस्थापकांनी (फंड मॅनेजर) नोंदविले आहे. 
 
‘सेबी’ने दिलेल्या माहितीनुसार, करबचतीसाठी आता थोडाच अवधी राहिल्याने इक्विटी-लिंक्ड सेविंग स्कीम (ईएलएसएस) मध्ये 1.74 लाख नवीन खाती जोडली गेली आहेत. सामन्यतः जानेवारी-मार्चमध्ये गुंतवणूकदार कर बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर ईएलएसएस योजनेत पैसे गुंतवतात. करबचत करण्यासाठी फत्तम पर्याय म्हणून इक्विटी संलग्न बचत योजना (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्किम किंवा ईएलएसएस) ओळखली जाते. हे फंड इक्विटी किंवा समभागांमध्ये गुंतवणूक करतात. यासाठी गुंतवणूकदाराला लाभांश किंवा वृद्धी यापैकी पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य असते. शिवाय प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर वजावटीचा लाभ मिळविला जाऊ शकतो. गेल्या महिन्यात ईएलएसएसच्या माध्यमातून 6,158 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. 

अभिप्राय द्या!