भारतीय हवाई दलाने पाकमधील बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांचा परिणाम शेअर बाजारावरही झालेला पाहायला मिळाला. आज मुंबई शेअर बाजार २४१ अंकांच्या घसरणीसह ३५,९७१ अकांवर उघडला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (निफ्टी) ८१ अंकांच्या घसरणीसह १०,८०० अकांवर कोसळत १०,७९८ अकांवर उघडला. सकाळी साडे नऊवाजता सेन्सेक्स २४६ अंकांच्या घसरणीसह ३५९६७ अंकांवर, तर निफ्टी ८१ अंकांच्या घसरणीसह १०७९८ अंकांवर पोहोचला.

या समभागांमध्ये तेजी

सेन्सेक्समध्ये स्वान एनर्जी, ओरिएंट सिमेंट, आयएलअॅण्डएफएस, ट्रान्स्पोर्ट, मॅक्स इंडिया आणि THERMAX लिमिटेड या समभागांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तर, निफ्टीमध्ये भारती एअरटेल, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलजी, अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेण्ट्सच्या समभागांमध्ये तेजीचे वातावरण आहे.

या समभागांमध्ये घसरण

सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, सन क्लॉयड, डीएचएफएल, प्रेस्टीज, आरती इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये मंदीचे वातावरण आहे. निफ्टीमध्ये एस बँक, हीरो मोटोकॉर्प, जेएसडब्ल्यू स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ग्रॉसिमच्या समभागांमध्ये मंदी पाहायला मिळत आहे.

आत्ता बाजार बंद होताना निफ्टी ५४ अंकांनी घसरला असून १०८२९ ला ट्रेड करत आहे !!

अभिप्राय द्या!

Close Menu