भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) भांडवली पाठबळ लाभलेली बँक आता एलआयसीची कॉर्पोरेट एजंट म्हणून सेवा देणार आहे.IDBI बँक व एलआयसीमध्ये नुकत्याच झालेल्या करारानुसार एलआयसीच्या सर्व पॉलिसी लवकरच या बँकेच्या सर्व शाखांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील .

भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) भांडवली पाठबळ लाभलेली बँक आता एलआयसीची कॉर्पोरेट एजंट म्हणून सेवा देणार आहे. IDBI बँक व एलआयसीमध्ये नुकत्याच झालेल्या करारानुसार एलआयसीच्या सर्व पॉलिसी लवकरच या बँकेच्या सर्व शाखांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील.

आयडीबीआय बँकेच्या देशभरात अठराशे शाखा असून या बँकेचे १.८ कोटी ग्राहक आहेत. या सर्व शाखांमध्ये एलआयसीच्या पॉलिसी ग्राहकांना विकत घेता येतील. यासाठी बँकेला कमिशन मिळेल. याशिवाय, ग्राहकांना या बँकेच्या शाखेत पॉलिसींचे प्रीमियमदेखील भरता येतील. यामुळे बँकेला मोठ्या प्रमाणावर रोकड उपलब्धता होईल. या बँकेच्या शाखा देशभरात पसरल्या असल्याने एलआयसीच्या व्यवसायाची व्याप्तीही वाढणार आहे.

अभिप्राय द्या!