एल अँड टी फायनान्सतर्फे सिक्‍युअर्ड रिडीमेबल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरची (एनसीडी) विक्री सहा मार्चपासून केली जाणार आहे. या डिबेंचरचे दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) प्रत्येकी एक हजार रुपये आहे. यातून एकूण 1500 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. या डिबेंचरची विक्री 20 मार्चपर्यंत चालणार असली, तरी एकूण प्रतिसाद पाहून ती तत्पूर्वी थांबविली जाऊ शकते. “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर एनसीडींचे वाटप केले जाणार आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला कमीतकमी दहा हजार रुपयांच्या दहा एनसीडींसाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यापुढे एक हजार रुपयांच्या पटीत अर्ज करता येणार आहे. फक्त डी-मॅट स्वरूपातच हे डिबेंचर दिले जाणार असून, त्यासाठी धनादेश न देता फक्त “ऍस्बा’ पद्धतीने अर्ज करता येणार आहे. हे डिबेंचर 37, 60 आणि 120 महिन्यांच्या मुदतीचे असून, त्यावर छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांना वार्षिक 9.10, 9.25 आणि 9.35 टक्के व्याज देण्यात येईल. 60 आणि 120 महिन्यांच्या मुदतीसाठी मासिक व्याजाचा पर्यायही उपलब्ध राहणार असून, त्यावर 8.89 आणि 8.98 टक्के व्याजदर असेल. फक्त डी-मॅट स्वरूपातच हे डिबेंचर दिले जाणार असून, त्यासाठी धनादेश न देता फक्त “ऍस्बा’ पद्धतीने अर्ज करता येणार आहे. वाटपानंतर हे डिबेंचर शेअर बाजारात नोंदविले जाणार आहेत. या इश्‍यूला “केअर’ आणि “इक्रा’ या पतमानांकन संस्थांकडून “एएए’चा दर्जा देण्यात आला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu