डीएचएफएलमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचे ऑडिट रिपोर्टमधून समोर आले आहे. जानेवारी महिन्यात भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा गैरव्यवहार डीएचएफएल या एनबीएफसी कंपनीत झाल्याचा खळबळजनक दावा कोब्रापोस्ट या वृत्तसंस्थेने केला होता. यानंतर कंपनीने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट फर्म टी पी ओसवाल अँड असोसिएट्सची नियुक्ती केली होती. या संस्थेने कंपनीला अहवाल दिला असून कंपनीत कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर डीएचएफएलचा शेअर 21.2 टक्क्यांनी वाढून 162.3 रुपयांवर पोचला होता.
जानेवारी महिन्यात कोब्रापोस्ट या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, डीएचएफएल समूहामध्ये 31 हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असून कंपनीच्या प्रवर्तकांनी स्वतःच्या फायद्यासाठी बनावट कंपन्यांच्या आधारे कोट्यवधींची अफरातफर केल्याचे म्हटले होते. कंपनीच्या प्रवर्तकांनी 21,477 कोटी रुपये कर्ज आणि गुंतवणुकीच्या नावाखाली सरळसरळ बनावट खात्यांमध्ये वर्ग केल्याचा दावा कोब्रापोस्टने केला होता. यानंतर डीएचएफएलच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली होती.

अभिप्राय द्या!

Close Menu