सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जदर आणि बचत खात्यावरील व्याजदराचा संबंध थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात केली गेल्यास त्याचा तत्काळ फायदा एसबीआयच्या खातेधारकांना मिळणार आहे. तसेच रेपो दर वाढल्यास कर्ज आणि ठेवींवरील व्याजदरात देखील वाढ होईल. बँकेचा व्याजदर थेट रेपोदराशी जोडणारी देशातील पहिली बँक ठरणार आहे. हा निर्णय येत्या 1 मेपासून लागू होणार आहे.
 
लहान कर्जदार आणि ठेवीधारकांना मात्र यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक ठेवी असलेल्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. शिवाय कमी कालावधी असणारे ‘कॅश क्रेडिट’ आणि ‘ओव्हर ड्राफ्ट’ची मर्यादा देखील एक लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. म्हणजेच एक लाख रुपयांच्या अधिक रकमेचे ‘कॅश क्रेडिट’ आणि ‘ओव्हर ड्राफ्ट’ हे देखील रेपो दराशी जोडले जाणार आहेत. 

अभिप्राय द्या!

Close Menu