मिराए अॅसेट म्युच्युअल फंडाने निश्चित उत्पन्न गटात मिराए स्थिर मुदतपुर्ती-मालिका तीन  (मिराए अॅसेट फिक्स्ड मॅच्युरिटी-सिरीज थ्री) हा नवीन फंड बाजारात आणला आहे. या फंडाची मुदत 1122 दिवस आहे.
 
सदर एफएमपी फंडातील निधी प्रामुख्याने ”ट्रिपल ए’ रेटींग असलेले कंपनी रोखे तसेच चलन बाजारातील विविध साधनांमध्ये गुंतविला जाणार आहे. सध्याच्या प्रचलित व्याजदरानुसारच ही गुंतवणूक अपेक्षित आहे. निश्चित उत्पन्न विभागाचे प्रमुख महेंद्र जाजू यांच्याकडे या फंडाची जबाबदारी राहणार आहे.
 
मिराए म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनेतील गुंतवणुकीने वीस हजार कोटींचा टप्पा ओलांडला असून फंड 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत एकूण 23 हजार 900 कोटींच्या निधीचे व्यवस्थापन यशस्वीपणे सांभाळत आहे. गेल्या वर्षात मिराएने 50 टक्के वृध्दी नोंदविली असून निधी व्यवस्थापनानुसार मिराए अॅसेट म्युच्युअल फंड हा भारतातील वेगाने वाढणाऱ्या फंडांपैकी एक ठरला आहे. गेल्या साडेचार वर्षातील मिराए फंडाची कामगिरी दमदार राहीली असून निधी व्यवस्थापनात 47 पट वाढ झाली आहे. जुलै 2013 मध्ये फंडाकडे केवळ पाचशे कोटी रुपये होते. ते आता 47 पटींहून अधिक वाढले आहे. 

अभिप्राय द्या!

Close Menu