कार्यकुशल अभियंता आणिक तत्पर जो अधिकारी,
अर्थकारणी सहज ज्याची बुद्धी घेत भरारी,
बुध्दीबळाच्या सामर्थ्याने उधळी शत्रूचे डाव,
अष्टपैलू जणू हिरा असा जो : ‘प्रदीप’ त्याचे नाव!
सर्व जग फिरते ते पैशावर, पैशामुळे आणि पैशासाठीच! आता हा पैसा जर आपल्या आयुष्याचा इतका महत्वाचा भाग आहे तर त्याची काळजी घेणारे लोकसुध्दा तेवढेच तावून सुलाखून शोधायला हवेत नाही का?
“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थवृध्दिच्या विविध योजना समजावणारी आपली माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाची सुरुवात तीन वर्षापूर्वी “कार्यकारी अभियंता” या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. शासकीय नोकरीच्या ३३ वर्षांच्या प्रवासात अनेक प्रकारच्या कामांबरोबर अनेक बरे वाईट अनुभव आले. पैश्याभोवती फिरणारी दुनिया ,पैश्यासाठी फसणारे व लुबाडणूक करणारे अनेक लोक दिसले. श्रम करून मिळालेला पैसा हा गुंतवणूक करताना चूक झाल्यास आयुष्याची पुंजी गमावण्याची पाळी आलेले लोकही भेटले व त्यांचे दुःख पाहून समाजाची एक वेगळी बाजूही दिसली.
लहानपणी समजलेले पैशाचे महत्व आणि मिळालेल्या पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक होण्याची किती गरज आहे याची जाणीव होऊन अशा फसलेल्या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे हा विचार बळावून हेच काम निवृत्तीनंतर करायचे ठरवले. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परीक्षा देऊन शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार( IFA ) हे पदही प्राप्त झाले आहे.
मराठी माणसाने आपल्या आजूबाजूच्या लोकांना मराठीतून “अर्थचा अनर्थ” न करता मार्गदर्शन करून आपली पुंजी कशी वृद्धिंगत करावी व जीवनाला खरा “अर्थ”कसा प्राप्त करावा हे सांगणारे हे “शेअरखान सावंतवाडी”, प्रज्वलित दीप इति प्रदीप: याची खात्री देणारे कार्यालय आहे.
तुम्हाला शेअर्ससंबंधीची व म्युचुअल फंडासंबंधीची व यामधील गुंतवणुकीची कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा शंका असल्यास “आम्ही आहोतच” असे समजून निश्चिंत व्हा. कारण आम्ही २४ X ७ मोबाईलवर ‘Whats App’ च्या खिडकीवर उपलब्ध आहोत. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा आमच्या बांधवांसाठी 8275881024 वर सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ऑफीसमधे आहोतच!
प्र
प्रयत्न
दी
दीपलक्ष्मी
प
परीसस्पर्श
जो
जोखीम
शी
शील