आकर्षक फंड
या आठवड्यापासून या ठिकाणी काही आकर्षक फंडांची यादी दिली जाईल .
या आठवड्यापासून या ठिकाणी काही आकर्षक फंडांची यादी दिली जाईल .
आपल्या भागात अनेक पतपेढ्या चांगल्या रितीने कार्यरत आहेत. बऱ्याच पतपेढ्या कर्जमागणीचा पुरवठा करण्यासाठी आपल्याकडील ठेवी चालू खाते (Current Account) मध्ये ठेवतात व त्यावर त्यांना काहीही व्याज मिळत नाही. तसेच जर ही रक्कम ६ महिन्यांच्या किंवा वर्षभराच्या कालावधीसाठी Fix Deposit मध्ये ठेवली तर कर्जमागणी झाल्यावर ह्या Fix Deposits मोडाव्या लागतात किंवा त्यावर Overdraft घ्यावा लागतो व याद्वारे पतपेढ्यांचे किमान २% पर्यंत नुकसान होऊ शकते.तथापि जर ही रक्कम G. Sec फंड किंवा Floating Rate फंड मध्ये ठेवल्यास त्यावर दरदिवशी व्याज प्राप्ती होऊ शकते व संस्थेचा फायदा होतो. साधारणतः हे व्याज ७% ते ८% पर्यंत असते. हा व्याजदर चक्रवाढ पद्धतीचा असतो हेही तितकेच…
UTI LONG TERM ADVANTAGE FUND SERIES V सर्व म्युच्युअल फंड घराणी अशा प्रकारच्या विविध योजना विक्रीसाठी वेळोवेळी बाजारात आणत असतात. सर्वसाधारणतः त्यामधे ‘भरलेली रक्कम ही तीन वर्षापर्यंत काढता येत नाही.’ तथापि मिळणारी रक्कम ही “टॅक्स फ्री” असते व पैसे जमा करणे किंवा काढणे या सर्व बाबी आधुनिक सोई सुविधा वापरून- Mobile App व्दारे सुध्दा करणे शक्य आहे. ही युटीआय तर्फे सुरु असलेली 80 C अंतर्गत सवलत देणारी मार्केटलिंक योजना आहे.यात भरलेले पैसे तीन वर्षे काढता येत नाहीत. पण ही योजना तीन ते दहा वर्षापर्यंत सुरु राहते .अशा प्रकारच्या अनेक योजना सर्व म्युच्युअल फंड हाउसेस NFO या प्रकाराखाली आणत असतात.
LIC ऑफ इंडिया (Life Insurance Corporation of India) तर्फे मुलींसाठी कन्यादान योजनासुद्धा अत्यंत आकर्षक स्वरूपात सुरु आहे.साधारणपणे सध्या मुलीच्या लग्नाचा खर्च ५ लाख रु. आहे. १५ वर्षानंतर तो किमान १२ लाख होऊ शकतो व कदाचित २५ वर्षानंतर तो ३० लाख होऊ शकतो. या योजनेत दररोज रु. १५३/- मात्र २२ वर्षांपर्यंत जमा केल्यास २५ व्या वर्षी LIC तर्फे रु. ३३,००,००० मिळू शकतात व या कालावधीत पालकांचे काही बरे- वाईट झाल्यास हा सगळा भार LIC तर्फे उचलला जातो.या संदर्भातील विस्तृत माहितीसाठी LIC चे विमा प्रतिनिधी श्री. विठ्ठल दिनकर उर्फ भाऊ साळगावकर यांच्याशी संपर्क साधावा-मोबाईल क्र. - ९४२२४३४८२७दूरध्वनी क्र. – ०२३६५ २५३२८५
म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करून त्यतील मिळणारा डीव्हिडंड किंवा फायदा एखादा गुंतवणूकदार कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी सामना करणाऱ्या व्यक्तींना मदत करणाऱ्या संस्थेकडे वर्ग करण्याची सोय सुध्दा म्युचुअल फंडातर्फे केली आहे. फक्त अशा सेवाभावी संस्थांची निवड करण्याचा अधिकार गुंतवणूकदाराला नाही. एचडीएफसी म्युचुअल फंडाने सुध्दा HDFC DEBT FUND FOR CANCER CURE 2014 अशी सेवा सुरु केली आहे. एखादा गुंतवणूकदार कोणालाही न समजता आपली आर्थिक मदत अशा संस्थेला परस्पर करू शकतो हे या फंडांचे वैशिष्ठ्य आहे. या साठी गुंतवणूक दाराने फक्त आपल्याला मिळणारा नफा कुठे वर्ग करावयाचा त्यावर टीकमार्क केले की ही बाब पूर्ण होऊ शकते. एचडीएफसी म्युच्युअल फंड हा क्लोज एन्डेड फंड असून…
युनोच्या लोकसंख्या वाढीच्या अभ्यासानुसार माणसाचे सरासरी आयुष्य हे २०५० पर्यंत ७५ वर्षे होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाढत्या माहागाइला तोंड देण्यासाठी आपले उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न हे करावेच लागतात. सेवानिवृत्ती नंतरचे नियोजन तर अपरिहार्य आहे. हा विषय लक्षात घेऊन युटिआय ने एक निवृत्ति विशेष योजना साकारली आहे. तिची वैशिष्ठे खालील प्रमाणे :यामधे दरमहा किमान रु. ५०० भरणे आवश्यक आहे.यामधून मिळणाऱ्या परताव्याचा व्याजदर हा साधारणतः ११% पेक्षा जास्त (CAGR) चक्रवाढीसह मिळू शकतो.वर्षात एकूण जमा रकमेवर 80 c अंतर्गत करसवलत प्राप्त होते.भरलेली रक्कम ५ वर्षानंतर केव्हाही काढता येते. यामधे गुंतवणुकीसाठी कमाल वयोमर्यादा नाही.यामधे online व अॅपद्वारे सुध्दा गुंतवणूक करता येते.बँकेद्वारे एकदा सूचना देऊन पैसे…
‘युनिट ट्रस्ट’ या म्युच्युअल फंडामधे धर्मादाय संस्था किंवा गृहनिर्माण संस्था आपला निधी ठेऊ शकतात. हे खाते उघडण्यासाठी संस्थेकडे फक्त स्वतःचे पॅन कार्ड व बँक खाते असणे आवश्यक असते. यामधे मिळणारे व्याज हे बॅंकेतर्फे मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असल्याने संस्थेचा अंतिमतः फायदा होतो. तसेच अशा फंडामधे निधी गुंतवणे हे लेखापरिक्षकाच्या दृष्टीने चुकीचे होत नाही. या खात्यात असलेला निधी हा केव्हाही काढणे शक्य असते.
हीयोजना कुठल्या कंपनीची किंवा बॅंकेची नसून श्री प्रदीप जोशी ह्यांच्या संकल्पनेतून साकारलेली अफलातून योजना आहे. ह्यामुळे कोणतेही दीर्घ मुदतीचे कर्ज 0% व्याजदराने वापरता येउ शकते, केवळ नियोजनाच्या माध्यमातून.उदाहरण :-समजा तुम्ही रु. १० लाख रुपयांचे कर्ज २० वर्ष मुदतीने ९.५% व्याजाने घेतले आहेत्याचा मासिक हप्ता रु. ९,३२१/- आहेम्हणून २० वर्षात तुम्ही :मुळ कर्ज – रु. १० लाखव्याज – रु. १२.३७ लाखअसे एकूण रु. २२.३७ लाख रुपये परत देता.तुमचे व्याज परत मिळविण्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या कर्ज रकमेपैकी ०.१०% रक्कम SIP मधे गुंतवा.इथे तुमचे रु. १० लाख कर्ज आहे म्हणजेच ०.१०% रक्कम होते रु. १०००.ही रु. १००० ची SIP २० वर्षासाठी Equity किंवा…
युटीआय म्युच्युअल फंडा तर्फे सर्वात जुनी परंतू परताव्यात सातत्य असणारी युलिप (Unit Link Insurance Plan) ही एक अत्यंत सुंदर अशी योजना आहे. ज्यांना जीवन विमा संरक्षणासह भांडवल वृध्दिचाही लाभ अपेक्षित आहे अशा सर्वांसाठी ही अत्यंत सुंदर अशी योजना आहे. गेली ४५ वर्षे ही योजना कार्यान्वित असून यामध्ये मिळणाऱ्या परताव्याचा दर हा ११% पेक्षा जास्तही राहू शकतो. याच नावाने अन्य फंड घराण्यांनी सुरु केलेल्या योजनांद्वारे मिळणारा परतावा थोडाफार कमी आहे हेही निदर्शनास आले आहे. वय वर्ष १२ ते ५५ १/२ पर्यंतची कोणतीही व्यक्ती किमान रु. ५०० भरून यामधे सहभागी होऊ शकते व या सदस्याला १५ वर्षांपर्यंत रु. ९०,००० किमान संरक्षण प्राप्त होते.…
युनोच्या लोकसंख्यावाढीच्या अभ्यासानुसार माणसाचे सरासरी आयुष्य हे २०५० पर्यंत ७५ वर्षे होणार आहे.त्यामुळे प्रत्येकाला वाढत्या माहागाईला तोंड देण्यासाठी आपले उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न हे करावेच लागतात. राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना ही सर्वांसाठी सन २००८ पासून सुरु झाली असून केंद्र सरकार सन २०१७/२०१८ पर्यंत काही रक्कम प्रोत्साहन म्हणून हे खाते उघडणाऱ्या व्यक्तीला देणार आहे.हे खाते उघडणाऱ्या प्रत्येकाला Permenent Retirement Account Number (PRAN) प्राप्त होतो व तो कायमस्वरूपी राहतो.यामधे Tier I Account व Tire II Account अशी दोन प्रकारची खाती असतात. Tire I मधून भरलेले पैसे निवृत्ती पर्यंत काढण्याचा पर्याय नसतो. Titre II साठी अधून मधून पैसे काढणे शक्य असते, तथापि यात करसवलत मिळत…