पतपेढ्यांसाठी फंड
आपल्या भागात अनेक पतपेढ्या चांगल्या रितीने कार्यरत आहेत. बऱ्याच पतपेढ्या कर्जमागणीचा पुरवठा करण्यासाठी आपल्याकडील ठेवी चालू खाते (Current Account) मध्ये ठेवतात व त्यावर त्यांना काहीही व्याज मिळत नाही. तसेच जर ही रक्कम ६ महिन्यांच्या किंवा वर्षभराच्या कालावधीसाठी Fix Deposit मध्ये ठेवली तर कर्जमागणी झाल्यावर ह्या Fix Deposits मोडाव्या लागतात किंवा त्यावर Overdraft घ्यावा लागतो व याद्वारे पतपेढ्यांचे किमान २% पर्यंत नुकसान होऊ शकते.तथापि जर ही रक्कम G. Sec फंड किंवा Floating Rate फंड मध्ये ठेवल्यास त्यावर दरदिवशी व्याज प्राप्ती होऊ शकते व संस्थेचा फायदा होतो. साधारणतः हे व्याज ७% ते ८% पर्यंत असते. हा व्याजदर चक्रवाढ पद्धतीचा असतो हेही तितकेच…