पतपेढ्यांसाठी फंड

आपल्या भागात अनेक पतपेढ्या चांगल्या रितीने कार्यरत आहेत. बऱ्याच पतपेढ्या कर्जमागणीचा पुरवठा करण्यासाठी आपल्याकडील ठेवी चालू खाते (Current Account) मध्ये ठेवतात व त्यावर त्यांना काहीही व्याज मिळत नाही. तसेच जर ही रक्कम ६ महिन्यांच्या किंवा वर्षभराच्या कालावधीसाठी Fix Deposit मध्ये ठेवली तर कर्जमागणी झाल्यावर ह्या Fix Deposits मोडाव्या लागतात किंवा त्यावर Overdraft घ्यावा लागतो व याद्वारे पतपेढ्यांचे किमान २% पर्यंत नुकसान होऊ शकते.तथापि जर ही रक्कम G. Sec फंड किंवा Floating Rate फंड मध्ये ठेवल्यास त्यावर दरदिवशी व्याज प्राप्ती होऊ शकते व संस्थेचा फायदा होतो. साधारणतः हे व्याज ७% ते ८% पर्यंत असते. हा व्याजदर चक्रवाढ पद्धतीचा असतो हेही तितकेच…

दीर्घ मुदत योजना

UTI LONG TERM ADVANTAGE FUND SERIES V सर्व म्युच्युअल फंड घराणी अशा प्रकारच्या विविध योजना विक्रीसाठी वेळोवेळी बाजारात आणत असतात. सर्वसाधारणतः त्यामधे ‘भरलेली रक्कम ही तीन वर्षापर्यंत काढता येत नाही.’ तथापि मिळणारी रक्कम ही “टॅक्स फ्री” असते व पैसे जमा करणे किंवा काढणे या सर्व बाबी आधुनिक सोई सुविधा वापरून- Mobile App व्दारे सुध्दा करणे शक्य आहे. ही युटीआय तर्फे सुरु असलेली 80 C अंतर्गत सवलत देणारी मार्केटलिंक योजना आहे. यात भरलेले पैसे तीन वर्षे काढता येत नाहीत. पण ही योजना तीन ते दहा वर्षापर्यंत सुरु राहत असल्याने तीन वर्षानंतर दहा वर्षापर्यंत हे पैसे केव्हाही कोणत्याही पध्दतीने काढता येतील व…

रिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड

युनोच्या लोकसंख्या वाढीच्या अभ्यासानुसार माणसाचे सरासरी आयुष्य हे २०५० पर्यंत ७५ वर्षे होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाढत्या माहागाइला तोंड देण्यासाठी आपले उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न हे करावेच लागतात. सेवानिवृत्ती नंतरचे नियोजन तर अपरिहार्य आहे. हा विषय लक्षात घेऊन युटिआय ने एक निवृत्ति विशेष योजना साकारली आहे. तिची वैशिष्ठे खालील प्रमाणे :यामधे दरमहा किमान रु. ५०० भरणे आवश्यक आहे.यामधून मिळणाऱ्या परताव्याचा व्याजदर हा साधारणतः ११% पेक्षा जास्त (CAGR) चक्रवाढीसह मिळू शकतो.वर्षात एकूण जमा रकमेवर 80 c अंतर्गत करसवलत प्राप्त होते.भरलेली रक्कम ५ वर्षानंतर केव्हाही काढता येते. यामधे गुंतवणुकीसाठी कमाल वयोमर्यादा नाही.यामधे online व अॅपद्वारे सुध्दा गुंतवणूक करता येते.बँकेद्वारे एकदा सूचना देऊन पैसे…

चॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड

‘युनिट ट्रस्ट’ या म्युच्युअल फंडामधे धर्मादाय संस्था किंवा गृहनिर्माण संस्था आपला निधी ठेऊ शकतात. हे खाते उघडण्यासाठी संस्थेकडे फक्त स्वतःचे पॅन कार्ड व बँक खाते असणे आवश्यक असते. यामधे मिळणारे व्याज हे बॅंकेतर्फे मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असल्याने संस्थेचा अंतिमतः फायदा होतो. तसेच अशा फंडामधे निधी गुंतवणे हे लेखापरिक्षकाच्या दृष्टीने चुकीचे होत नाही. या खात्यात असलेला निधी हा केव्हाही काढणे शक्य असते.

युनीट लिंक इन्शुरन्स प्लान

युटीआय म्युच्युअल फंडा तर्फे सर्वात जुनी परंतू परताव्यात सातत्य असणारी युलिप (Unit Link Insurance Plan) ही एक अत्यंत सुंदर अशी योजना आहे. ज्यांना जीवन विमा संरक्षणासह भांडवल वृध्दिचाही लाभ अपेक्षित आहे अशा सर्वांसाठी ही अत्यंत सुंदर अशी योजना आहे. गेली ४५ वर्षे ही योजना कार्यान्वित असून यामध्ये मिळणाऱ्या परताव्याचा दर हा ११% पेक्षा जास्तही राहू शकतो. याच नावाने अन्य फंड घराण्यांनी सुरु केलेल्या योजनांद्वारे मिळणारा परतावा थोडाफार कमी आहे हेही निदर्शनास आले आहे. वय वर्ष १२ ते ५५ १/२ पर्यंतची कोणतीही व्यक्ती किमान रु. ५०० भरून यामधे सहभागी होऊ शकते व या सदस्याला १५ वर्षांपर्यंत रु. ९०,००० किमान संरक्षण प्राप्त होते.…

इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम

आजकाल सामान्य नोकरदार सुध्दा भरघोस पगारामुळे Income Tax भरणा करण्याच्या छत्राखाली येऊ शकतो. गेल्या वर्षी किंवा याही वर्षी करभरणा करण्याच्या स्लॅबमध्ये भरघोस सवलत मिळेल असे वाटत होते पण...... इन्कमटॅक्स Act कलम 80 C अंतर्गत आपण विविध योजनांमधे रु. १.५० लाख पर्यंतची गुंतवणूक केल्यास तेवढी रक्कम आपणास “कर सवलत” या सदराखाली गृहीत धरता येते हे जवळ जवळ सर्वांना माहिती आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी कोणीही पगारदार व्यक्ती ही सवलत घेण्यासाठी PPF खाते, N.S.C किंवा जीवन विमा फार झाले तर ५ वर्षे बँकेतील ठेवी यामधे गुंतवणूक करून ही सवलत प्राप्त करून घेतो. पण या बचतीतून म्हणावा तेवढा परतावा मुदतींती मिळत नाही व काही…

बाल भविष्य योजना

सध्याच्या काळात आपल्या मुलांचे शिक्षणरुपी भविष्य पूर्ण करण्यासाठी आपण अपेक्षा करतो त्यपेक्षाही कितीतरी जास्त पैसा लागू शकतो. K. G. तील प्रवेशापासून ते अभियांत्रिकी वा वैद्यकीय शिक्षणासाठीच्या खर्चात सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी आपण बाळाचे भवितव्य उज्वल होण्यासाठी “UTI- Children’s Carrier Plan” या योजनेद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. ही योजना १९७३ पासून सुरु करण्यात आली असून अत्यंत चांगला परतावा आतापर्यंत या योजनेतून अनेकांनी घेतला आहे. ही एक म्युच्युअल फंडावर आधारित योजना आहे. म्युच्युअल फंड मॅनेजर हे पैसे ६०% डेट फंड व ४०% इक्विटी फंडात गुंतवितो. यामधे दरमहा रु. १००० गुंतविल्यास त्याचे बाल सज्ञान होईपर्यंत (वय वर्ष १८…

फ्लोटिंग रेट फंड

अनेक व्यावसायिक संस्था किंवा व्यक्ति आपले व्यावसायिक व्यवहार बँकेच्या करंट अकाउंट अथवा बचत खात्यामार्फत करतात. करंट अकाउंटवर जी रक्कम असेल तिला काहीही व्याजप्राप्ती होत नाही. तसेच बचत खात्यावरील रकमेवर मिळणारे ३ % ते ४ % व्याज हे चाक्रवाढीच्या स्वरूपात नसते. बँकेच्या खात्यात बिनव्याजी असलेली रक्कम किंवा काही दिवासांसाठी न लागणारी रक्कम आपण म्युचुअल फंडाच्या "फ्लोटिंग रेट फंड" किंवा कॅश मॅनेजर किंवा जीसेक फंड किंवा ट्रेझरी adavntage फंड यामधे कमीत कमी दोन दिवसांसाच्या कालावाधीसाठीसुध्दा ठेऊ शकतो व त्यावर सामान्यपणे ६% ते ८% व्याजही मिळवू शकतो. हे व्याज चक्रवाढ गतीचे (CAGR) असते. साधारणतः सर्व बँका शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी बंद असतात त्यामुळे सुट्ट्या…

End of content

No more pages to load

Close Menu