नेशनल पेन्शन स्कीम
युनोच्या लोकसंख्यावाढीच्या अभ्यासानुसार माणसाचे सरासरी आयुष्य हे २०५० पर्यंत ७५ वर्षे होणार आहे.त्यामुळे प्रत्येकाला वाढत्या माहागाईला तोंड देण्यासाठी आपले उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न हे करावेच लागतात. राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना ही सर्वांसाठी सन २००८ पासून सुरु झाली असून केंद्र सरकार सन २०१७/२०१८ पर्यंत काही रक्कम प्रोत्साहन म्हणून हे खाते उघडणाऱ्या व्यक्तीला देणार आहे.हे खाते उघडणाऱ्या प्रत्येकाला Permenent Retirement Account Number (PRAN) प्राप्त होतो व तो कायमस्वरूपी राहतो.यामधे Tier I Account व Tire II Account अशी दोन प्रकारची खाती असतात. Tire I मधून भरलेले पैसे निवृत्ती पर्यंत काढण्याचा पर्याय नसतो. Titre II साठी अधून मधून पैसे काढणे शक्य असते, तथापि यात करसवलत मिळत…