इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम

आजकाल सामान्य नोकरदार सुध्दा भरघोस पगारामुळे Income Tax भरणा करण्याच्या छत्राखाली येऊ शकतो. गेल्या वर्षी किंवा याही वर्षी करभरणा करण्याच्या स्लॅबमध्ये भरघोस सवलत मिळेल असे वाटत होते पण...... इन्कमटॅक्स Act कलम 80 C अंतर्गत आपण विविध योजनांमधे रु. १.५० लाख पर्यंतची गुंतवणूक केल्यास तेवढी रक्कम आपणास “कर सवलत” या सदराखाली गृहीत धरता येते हे जवळ जवळ सर्वांना माहिती आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी कोणीही पगारदार व्यक्ती ही सवलत घेण्यासाठी PPF खाते, N.S.C किंवा जीवन विमा फार झाले तर ५ वर्षे बँकेतील ठेवी यामधे गुंतवणूक करून ही सवलत प्राप्त करून घेतो. पण या बचतीतून म्हणावा तेवढा परतावा मुदतींती मिळत नाही व काही…

सुकन्या समृद्धि योजना

भारतात अजूनही स्त्रीभ्रूणहत्या होते. मुलगी जन्मली की एक, दोन दिवसात अर्भकाची हत्या करण्याचे प्रकार होतात. मग अशा घटना थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२- जानेवारी- २०१५ रोजी “सुकन्या समृध्दी योजना” ही योजना सुरु केली आहे.या अंतर्गत मुलीच्या पालकांनी मुलीच्या वयाच्या दहा वर्षापूर्वी कमीत कमी रु. १००० deposit ठेवून पोस्ट ऑफिस किंवा बॅंकेत असे खाते उघडावे. समजा पाच वर्ष वयाच्या मुलीच्या नावाने दरमहा रु. १००० ठेव जमा केली तर दरवर्षी रु. १२००० प्रमाणे १४ वर्षात रु. १,६०,००० होतील यावर व्याजासह रु. ६,३१,००० मिळू शकतात. यावर ९% पेक्षा जास्त व्याजदर आहे. याचे व्याज करमुक्त आहे.मुलीच्या लग्नापर्यंत किंवा वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत हे खाते…

बाल भविष्य योजना

सध्याच्या काळात आपल्या मुलांचे शिक्षणरुपी भविष्य पूर्ण करण्यासाठी आपण अपेक्षा करतो त्यपेक्षाही कितीतरी जास्त पैसा लागू शकतो. K. G. तील प्रवेशापासून ते अभियांत्रिकी वा वैद्यकीय शिक्षणासाठीच्या खर्चात सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी आपण बाळाचे भवितव्य उज्वल होण्यासाठी “UTI- Children’s Carrier Plan” या योजनेद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. ही योजना १९७३ पासून सुरु करण्यात आली असून अत्यंत चांगला परतावा आतापर्यंत या योजनेतून अनेकांनी घेतला आहे. ही एक म्युच्युअल फंडावर आधारित योजना आहे. म्युच्युअल फंड मॅनेजर हे पैसे ६०% डेट फंड व ४०% इक्विटी फंडात गुंतवितो. यामधे दरमहा रु. १००० गुंतविल्यास त्याचे बाल सज्ञान होईपर्यंत (वय वर्ष १८…

फ्लोटिंग रेट फंड

अनेक व्यावसायिक संस्था किंवा व्यक्ति आपले व्यावसायिक व्यवहार बँकेच्या करंट अकाउंट अथवा बचत खात्यामार्फत करतात. करंट अकाउंटवर जी रक्कम असेल तिला काहीही व्याजप्राप्ती होत नाही. तसेच बचत खात्यावरील रकमेवर मिळणारे ३ % ते ४ % व्याज हे चाक्रवाढीच्या स्वरूपात नसते. बँकेच्या खात्यात बिनव्याजी असलेली रक्कम किंवा काही दिवासांसाठी न लागणारी रक्कम आपण म्युचुअल फंडाच्या "फ्लोटिंग रेट फंड" किंवा कॅश मॅनेजर किंवा जीसेक फंड किंवा ट्रेझरी adavntage फंड यामधे कमीत कमी दोन दिवसांसाच्या कालावाधीसाठीसुध्दा ठेऊ शकतो व त्यावर सामान्यपणे ६% ते ८% व्याजही मिळवू शकतो. हे व्याज चक्रवाढ गतीचे (CAGR) असते. साधारणतः सर्व बँका शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी बंद असतात त्यामुळे सुट्ट्या…

End of content

No more pages to load