न चुकविता येणाऱ्या चार गोष्टी
आर्थिक वर्ष २०२०-२१ हे ३१ मार्च २०२१ रोजी संपेल. ज्या करदात्यांनी विविध कलमानुसार अनुपालन अद्याप केले नसेल त्यांनी ३१ मार्चपूर्वी ते करावे. न चुकविता येणाऱ्या चार गोष्टी -- १ ज्या करदात्यांना २०१९-२० या वर्षाचे सुधारित विवरणपत्र दाखल करावयाचे आहे किंवा ज्या करदात्यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र अद्याप भरले नसेल तर ते विलंब शुल्क भरून ३१ तारखेपर्यंत दाखल करता येईल. २ ज्या करदात्यांनी नवीन कररचनेचा (कोणतीही गुंतवणूक न करता) विकल्प न निवडता जुनाच विकल्प निवडला असेल त्यांना २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी गुंतवणूक किंवा खर्च (उदा. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, गृह कर्जाचे हप्ते, विमा हप्ते, मेडिक्लेम, वगैरे) ३१ मार्चपूर्वी करावी लागेल.…