गुंतवणूक विभागून कशी करायची?

गुंतवणूक विभागून कशी करायची? समजा एखाद्या व्यक्तीचे (अविवाहित आणि स्वतंत्र) मासिक वेतन अर्थात निव्वळ वेतन ५० हजार रुपये आहे आणि याव्यतिरिक्त वर्षाला दोन लाख रुपये इन्सेंटिव्ह/बोनस रुपाने मिळतात, असे गृहीत धरले आहे. अशा व्यक्तीने गुंतवणूक कशी केली पाहिजे, हे पाहू. - एकूण रोकड ८ लाख रुपये - मासिक भाडे/ईएमआय १२००० गुणिले १२ = १.४४ लाख रुपये - मासिक खर्च १०००० गुणिले १२=१.२० लाख रुपये - गुंतवणूक योग्य रक्कम ५,३६,००० रुपये - पोस्ट ठेवी/बँक ठेवी/सरकारी रोखे ४० टक्के एकूण २.१५ लाख रुपये - पीपीएफ (मासिक ६२५० रुपये गुणिले १२ महिने) ७५ हजार रुपये - शेअर/एसआयपी वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत - सोने-चांदी…

आपण कोणती कर प्रणाली निवडावी?

केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकर विवरणपत्र भरताना नवा व जुना असे दोन पर्याय देण्यात आल्यामुळे आपल्यापैकी बहुतांश लोक हा नक्कीच विचार करत असतील की आपण कोणती कर प्रणाली निवडावी? आपल्या विद्यमान प्राप्तिकराच्या रचनेतील (जुनी प्रणाली) करदरांमध्ये काही सवलतीदेखील देण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, घरभाडे भत्ता (House Rent Allowance), भविष्य निर्वाह निधी (PF), विमा, म्युच्युअल फंड ईएलएसएस इत्यादीसारख्या विविध सवलती आणि गुंतवणूकींचा लाभ घेऊन कर कमी करण्याचे बरेच मार्ग आहेत. दुसरीकडे, नव्या करप्रणालीमध्ये प्राप्तिकर दर नक्कीच कमी आहेत. पण करदात्याला काही विशिष्ट सवलती आणि त्यामुळे मिळणारी करांमधील सूट उपलब्ध नसेल. आपल्यापैकी सर्वजण करसवलतीचा लाभ घेण्यासाठी आयुर्विमा, ईएलएसएस, आरोग्य विमा, इत्यादींमध्ये दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक…

वैयक्तिक अर्थनियोजन —

सध्या lock down मुळे बहुतेकजण घरीच राहत असून प्रत्येकाकडे थोडा - अधिक फावला  वेळ आहे ! या वेळेचा सदुपयोग आपणही करवा अशी धनलाभ ची इच्छा आहे ! त्या दृष्टीने आपण आपले personal finance वित्तनियोजन करण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे खाली देत आहे ते काळजीपूर्वक वाचावेत आणि आपले वित्तानियोजन आपणच करावे ही अपेक्षा आहे !! १) आपले insurance audit करा ! आपल्या प्रत्येकाकडे जीवन विमा हा असतोच पण त्याचे हप्ते , मिळणारा परतावा , आणि जीवन कवच याचा आपण केव्हाच विचार केलेलं नसतो. तो करून आपले कवच कमी असेल तर टर्म प्लान घ्यायचे निश्चित करावे आणि त्याचबरोबर मेडिकल policy सुद्धा घ्यावी !!…

“पॉवर ऑफ कम्पाउंडिंग’

गुंतवणुकीवर मिळणारा परतावा म्हणजे त्यावर मिळणारे "व्याज'. यावर तुमच्या संपत्तीत होणारी वाढ अवलंबून असते. हे परताव्याचे गणित सर्रास सरळ व्याज पद्धतीने मोजण्याचा सर्वांत सोपा मार्ग अवलंबिला जातो. समजा, वार्षिक 10 टक्के व्याजदराने 100 रुपये ठेव योजनेत गुंतविले, तर सरळ व्याज पद्धतीने लाभाचे सोपे गणित मांडताना एक वर्षानंतर तुमच्या मुद्दलावर परतावा म्हणून 10 रुपये मिळतील. पुढील वर्षीदेखील तुम्हाला 10 रुपये मिळतील. या पद्धतीने तुम्ही जितक्‍या कालावधीसाठी मुदतठेव केली असेल, तितक्‍या कालावधीसाठी तुम्हाला हे व्याज मिळेल. मात्र, त्यात वार्षिक 10 रुपयांचीच भर पडेल, म्हणजेच येथे ज्या रकमेवर व्याज मोजले आहे ती रक्कम, अर्थात मुद्दल तिन्ही वर्षांत एकसारखीच धरली आहे.    बहुतांश वित्तीय…

महिला दिन — धनलाभ तर्फे शुभेच्छा !!

कालच महिला दिन साजरा झाला !  सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत असे दिसत असूनही अनेक महिलांमध्ये अर्थसाक्षरता आहे हे जाणवत नाही ! महिलांनी  अर्थसाक्षर व्हावे यासाठी या काही प्राथमिक सूचना धनलाभतर्फे करण्यात येत आहेत !! बहुतांश महिला त्यांचे आर्थिक व्यवहार पाहत नाहीत, ही समस्या आहे. याच वेळी दीर्घकालीन निर्णय आणि आर्थिक नियोजन यापासून महिला दूर राहतात. महिलांना दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा आत्मविश्‍वास आणि अनुभव नसणे अथवा पतीकडून स्वातंत्र्य न मिळणे अथवा पालकांकडून त्यांच्यातील या नैसर्गिक क्षमतेला डावलले जाणे, ही यामागील कारणे असतात. खूप आधीपासून भारतीय महिला या बचत करणाऱ्या आणि खर्चाचे व्यवस्थापन करणाऱ्या आहेत, हे माहिती असूनही हे याकडे दुर्लक्ष झाले…

करोना हे संकट की संधी ?

आपल्या देशामध्ये आपण आधीच मंदीसदृश वातावरणाचा अनुभव घेत आहोत. अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर हा प्रत्येक तिमाहीत खाली येताना दिसत आहे, त्यात आता हे करोना संकट. जर हे संकट वेळीच आटोक्यात नाही आले तर आपण मंदीच्या विळख्यात लवकरच सापडू असे वाटणे चुकीचे नाही. आज आपल्या शेअर बाजाराने  आठवडय़ाभरात जरी दहा ते बारा टक्के नुकसान करून घेतले आहे आणि त्यात अजूनही वाढ होऊ शकेल अशी दाट शक्यता आहे. बऱ्याच भारतीय कंपन्या फारशी चांगली कामगिरी दाखवत नव्हत्या, परंतु सरकारने कराचे दर कमी केल्यामुळे त्यांना थोडा फायदा झाला. पण आपल्या देशातील ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा आणि ग्राहकोपयोगी वस्तू बनविणाऱ्या कंपन्या ज्या प्रमाणात चीनवर विसंबून आहेत, त्या…

महिला दिन आणि NPS व समृद्धी —

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचत करण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. हा आपल्या आयुष्याचा असा काळ असतो जेव्हा आपल्याला स्वतंत्र आणि चिंतामुक्त आयुष्य जगण्याची इच्छा असते. यासाठी सेवानिवृत्ती निधी तयार करणे हे गरजेचे असते, जेणेकरून उतारवयात आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल. छोट्या कुटुंबांच्या वाढत्या ट्रेंडमुळे सेवानिवृत्तीचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. काम करत असताना आणि धडधाकट आयुष्य जगतानाच निधी उभारायला सुरवात केली तर आपल्याला नियमित आवक सुरू राहते. या निधीतून निवृत्ती योजना खरेदी केल्या जाऊ शकतात. यातून मिळणारे उत्पन्न आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत सुरू राहते. गृहिणीसाठी पती या योजना खरेदी करू शकतात आणि संयुक्त परतावा पर्याय निवडू शकतात. यामुळे, काही अघटीत घडले तरीही त्यांना…

कुटुंबाचा अर्थसंकल्प

कुटुंबाचा अर्थसंकल्प कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजेच आपल्या सर्व खर्चांचे योग्य नियोजन होय. नोकरी किंवा व्यवसायातील उत्पन्नाचे  प्रभावीपणे नियोजन. कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्त्वाच्या घटकांमध्ये विभागू शकतो – १) दैनंदिन गरजांसाठीचा खर्च २) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठीचा खर्च ३) दैनंदिन खर्चासाठी बचत ४) दीर्घकालीन योजनांसाठी गुंतवणूक. आपले अल्पकालीन किंवा दीर्घकालीन ध्येय असे असावे की ते आपल्या आर्थिक क्षमतेच्या आवाक्यात असतील व त्याचा आपल्या नियोजनावर कधीच ताण पडणार नाही. (नवीन वाहन, नवीन घर किंवा मोठे घर, मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न तसेच निवृत्तिनियोजन वगैरे आदी झाले अल्पकालीन किंवा दीर्घकालीन खर्च.) स्वप्नपूर्तीसाठी गुंतवणूक करताना आपण भविष्यात होणाऱ्या खर्चाचा बारकाईने अभ्यास करून नियोजन करावयास हवे. उदाहरणार्थ…

अर्थसंकल्पातील तरतुदी –चिंतन हरीया म्हणतात —

गेल्याच आठवड्यात चिंतन हरीया (Head Product Development & strategy ICICI Pru fund) यांना भेटण्याचा योग आला. यावर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे म्युचुअल फंड संबंधातील होणाऱ्या बदलांचा आढावा त्यांनी घेतला!! त्यांच्या म्हणण्यानुसार - 1) पुढील आर्थिक वर्षापासून Dividend Distribution Tax (DDT) लागू झाल्यामुळे यापुढे dividend option असलेले फंड गुंतवणूदाराने घेण्याचे टाळावे. 2) नवीन Tax slab हा कमी उपन्न असलेल्या (below 5.0 Lakhs )गुंतवणूकदारांना स्विकारणे फायदेशीर ठरू शकते. आणि अशा मिळवत्या वर्गाकडून Consumption सेक्टर फायद्यात जाऊ शकतो त्यामुळे Consumption सेक्टरचा समभाग असलेले म्युच्युअल फंड जास्त फायदा देऊ शकतात. 3) अर्थमंत्र्यांनी आपल्या एकंदर दीड तासाच्या भाषणात पहिली तीस मिनिटे ही शेतकरी वर्गाला देण्यात…

करबचत करण्यासाठी–

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात करबचत करण्यासाठी अनेक गुंतवणूकदार विविध पर्याय शोधात असतात. प्राप्तिकराच्या कलम 80 सी अंतर्गत बचतीचा लाभ मिळेल अशा अनेक योजना / पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्यातल्या ठराविक पर्यायांचा घेतलेला  आढावा !! सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पब्लिक प्रॉव्हिडन्ट फन्ड (‘पीपीएफ’) ही केंद्र सरकारची, पूर्ण संरक्षण असलेली व करबचत मिळवून देणारी सर्वात लोकप्रिय योजना आहे. निश्चित परतावा, करबचत, दीर्घकालीन गुंतवणूक ही या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. या योजनेला 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी आहे. मात्र गुंतवणूकदाराला काही आर्थिक अडचण आल्यास तो लॉक-इन कालावधीच्या आधी यातील काही रक्कम काढू शकतो. कोणतीही व्यक्ती आपल्या ‘पीपीएफ’ खात्यात…

End of content

No more pages to load