पहिल्या ‘ग्रीन बाॅंड’ची लिस्टींग; ‘बीएसई’वर —- गाझियाबाद महापालिकेची निधी उभारणी
गाझियाबाद महानगरपालिकेने (Ghaziabad Corporation Green Bond) बीएसई बाँड प्लॅटफॉर्मचा उपयोग करून खासगी प्लेसमेंटच्या आधारे म्युनिसिपल बाँड्सच्या माध्यमातून १५० कोटी उभे केले. नुकताच मुंबई शेअर बाजारात हा बाॅंड सूचिबद्ध झाला आणि त्याचे सबस्क्रिप्शन ३१ मार्च २०२१ रोजी खुले झाले होते. या करपात्र बाँडचा कूपन दर वार्षिक ८.१० टक्के इतका निश्चित करण्यात आला आहे. 'इंडिया रेटिंग्ज' या पत मानांकन संस्थेकडून त्याला 'ए ए' मानांकन मिळाले आणि 'ब्रिकवर्क्स'कडून 'ए ए' (सीई) मानांकन मिळाले. पाणीपुरवठ्याशी संबंधित ध्येये आणि उद्दिष्ट्यांची पूर्तता करण्यासाठी महानगरपालिकेने साहिबाबाद इंडस्ट्रीज असोसिएशनशी करार केला आहे. या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या निधाचा अंशतः वापर तृतीयक सांडपाणी आणि पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे प्रस्तावित आहे. याचा…