मोतीलाल ओसवाल इंडेक्स फंड — NFO

देशातील आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी मोतीलाल ओसवालने दोन इंडेक्स फंड योजना बाजारात दाखल केल्या आहेत. मोतीलाल ओसवाल निफ्टी 50 इंडेक्स फंड आणि मोतीलाल ओसवाल निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड असे या दोन्ही योजनांची नावे आहेत. हे दोन्हीही फंड पॅसिव्ह प्रकारात मोडतात. यानिमित्ताने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी 50 या निर्देशांकात गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. ओपन एंडेड प्रकारातील या योजना आहेत. ज्या गुंतवणूकदारांना निफ्टी 50 या निर्देशांकात येणाऱ्या तेजीचा फायदा एसआयपीच्या माध्यमातून घ्यायचा आहे अशांसाठी ही योजना चांगला पर्याय ठरू शकते. 3 ते 17 डिसेंबर दरम्यान योजनांचा न्यू फंड ऑफर (एनएफओ) गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी 500 रुपयांपासून…

युटीआय म्युच्युअल फंडातील हिस्सेदारी कमी करण्याचे एसबीआय, बँक ऑफ बडोदाला आदेश

एलआयसी, एसबीआय आणि बँक ऑफ बडोदा या तीन भागधारकांना युटीआय एसेट मॅनेजमेंट कंपनीतील हिस्सा कमी करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. सार्वजिन क्षेत्रातील सरकारी मालकीच्या तीनही कंपनींची युटीआय म्युच्युअल फंडात 18.25 टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी आहे. त्यामुळे सेबीच्या नियमानुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत या कंपन्यांना आपला हिस्सा दहा टक्क्यांच्या खाली आणण्याचे आदेश सेबीने दिले आहेत.   सेबी नियमांनुसार कोणत्याही एका भागधारकाला फंड हाऊसमध्ये 10 टक्क्यांहून अधिक भागभांडवल ठेवण्याची परवानगी नाही.  आर्थिक हितसंबंधांमुळे संघर्ष होऊन कंपनीवर परिणाम होऊ नये म्हणून 2018 मध्ये सेबीने या मर्यादा आणल्या आहेत. त्यानुसार वरील तीनही कंपन्यांना या अगोदर देखील हिस्सेदारी कमी करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र कंपन्यांनी…

1 लाखाचे 10 वर्षात झाले 90 लाख !

कृषी विज्ञान क्षेत्रातील कंपनी, पीआय इंडस्ट्रीजने मागील 10 वर्षात गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. पीआय इंडस्ट्रीजने जवळपास 9,000 टक्क्यांचा परतावा मागील दशकभरात दिला आहे. 3 डिसेंबर 2009ला पीआय इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 16.46 रुपये प्रति शेअर इतकी होती. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाला त्यावेळेस राष्ट्रीय शेअर बाजारात पीआय इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 1487.55 रुपये प्रति शेअर इतकी होती. 2009 मध्ये जर पीआय इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असेल तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 90 लाख रुपयांवर पोचले आहे. काही दिवसांपूर्वीच पीआय इंडस्ट्रीजच्या शेअरने आतापर्यतची उचांकी पातळी गाठली होती. हा शेअर 1,529.95 रुपये प्रति शेअरवर पोचला होता. मागील वर्षी पीआय…

राधाकिशन दमानी डी-मार्टमधील हिस्सा विकणार —

देशातील प्रसिद्ध गुंतवणुकदार राधाकिशन दमानी डी-मार्टमधील आपला आणखी हिस्सा विकण्याची शक्यता आहे. अव्हेन्यू सुपरमार्ट्स ही कंपनी डी-मार्टची प्रवर्तक कंपनी आहे. अव्हेन्यू सुपरमार्ट्समधील आपला हिस्सा विकण्यासाठी राधाकिशन दमानी यांनी बॅंक ऑफ अमेरिका आणि कोटक महिंद्रा कॅपिटल यांची अंतिम यादीत निवड केली आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती आली आहे.    दमानी डी-मार्ट या रिटेल साखळीतील जवळपास 5.2 टक्के हिस्सा पुढील वर्षापर्यत विकण्याची शक्यता आहे. सध्या त्यांच्या हिश्याचे बाजारमूल्य जवळपास 82.3 कोटी डॉलर (जवळपास 5,870 कोटी रुपये) आहे. दमानी आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्यांचा डी-मार्टमधील एकूण हिस्सा 80.2 टक्के इतका आहे.   नवीन नियमावलीनुसार प्रवर्तकांना कंपनीतील हिश्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा…

सरकार जीएसटीचे दर वाढवण्याच्या विचारात

वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू होऊन तब्बल अडीच वर्ष झाली. यादरम्यान केंद्र सरकानं जीएसटीच्या स्लॅबमध्ये अनेक बदल केले. परंतु आता महसूल घटल्यानं पुन्हा एकदा जीएसटीचे स्लॅब बदलण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्याच्या ५ टक्क्यांचा जीएसटीचा स्लॅब वाढून ९ ते १० टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करामधून येणारा महसूल वाढवण्यासाठी जीएसटी काऊंन्सिल १२ टक्क्यांचा स्लॅब बंद करून यादरम्यान येणाऱ्या सर्व २४३ वस्तूंवर १८ टक्के करण्यावर विचार करू शकते. जर यावर शिक्कामोर्तब झालं आणि जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यात आले तर याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. GST स्लॅबमध्ये बदल झाल्यास सरकारी तिजोरीत १ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक वाढ होणार…

‘मिहद्रा टॉप २५० निवेश योजना’

महिंद्र म्युच्युअल फंडाने ‘मिहद्रा टॉप २५० निवेश योजना’ गुंतवणुकीस खुली केली आहे. या फंडाची विक्री शुक्रवारपासून सुरू झाली असून, ती २० डिसेंबपर्यंत सुरू असेल. ‘सेबी’च्या प्रमाणीकरणानुसार लार्ज आणि मिडकॅप गटात या फंडाचा समावेश केला गेला आहे. ८० ते १०० टक्के गुंतवणूक ही समभागांमध्ये तसेच समभागसंलग्न पर्यायांमध्ये असेल. ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० इंडेक्स टीआरआय’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक म्हणून निर्धारित करण्यात आला आहे. युनिट्सच्या वितरणापश्चात पाच व्यवहार दिवसांनंतर या फंडात नियमित खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होतील. बाजार भांडवलाचा ८९ टक्के हिस्सा व्यापणाऱ्या (३० जून २०१९ च्या आकडेवारीनुसार) अव्वल २५० कंपन्या हा या फंडाचा गुंतवणूक अवकाश आहे. लार्ज कॅप समभागांतून गुंतवणुकीला स्थिरता…

मोतीलाल ओस्वाल म्युच्युअल फंडाने आणले दोन नवे लार्ज कॅप इंडेक्स फंड

मोतीलाल ओस्वाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने दोन लार्ज कॅप इंडेक्स फंड बाजारात आणले आहेत. 'मोतीलाल ओस्वाल निफ्टी 50 इंडेक्स फंड' आणि 'मोतीलाल ओस्वाल निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड' अशी या नव्या फंडांची नावे आहे. या दोन्ही फंडाचा एनएफओ 3 डिसेंबरला खुला झाला असून त्याची अंतिम मुदत 17 डिसेंबर 2019 ही आहे. निफ्टी 50 आणि निफ्टी नेक्स्ट 50 या भारतातील दोन लोकप्रिय निर्देशांकावर हे दोन्ही नवे इंडेक्स फंड आधारलेले आहेत. छोट्यात छोटी म्हणजे अगदी 500 रुपयांपासूनची गुंतवणूक करता यावी हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन आम्ही हे दोन फंड बाजारात आणले आहेत. आमच्या इंडेक्स फंडांना गुंतवणूकदार आणि गुंतवणूक सल्लागार या दोघांचाही उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला…

युटीआय एएमसी आयपीओद्वारे विकणार 8.25 टक्के हिस्सा

देशातील सर्वात जुनी म्युच्युअल फंड कंपनी असलेली युटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आपला 8.25 टक्के हिस्सा आयपीओद्वारे विकणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा युटीआय एएमसीमध्ये असलेला हिस्सा बाजारात विकण्याचा युटीआयचा प्लॅन आहे. सध्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा युटीआय एएमसीमध्ये 18.25 टक्के हिस्सा आहे. त्यातील 8.25 टक्के हिस्सा युटीआय ऑफर फॉर सेल (ओएफएस) च्या माध्यमातून आयपीओद्वारे बाजारात आणणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने युटीआय एएमसीमधील हिस्सा विकण्याच्या प्रस्तावाला मंजूली दिली आहे. आयपीओच्या माध्यमातून युटीआय एएमसी 1 कोटी 4 लाख 59 हजार 949 इक्विटी शेअर बाजारात आणणार आहे. सेबीच्या मंजूरीसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. युटीआय एएमसीमध्ये चार देशांतर्गत गुंतवणूकदार आहेत.…

मोतीलाल ओस्वाल म्युच्युअल फंडाने आणले दोन नवे लार्ज कॅप इंडेक्स फंड

मोतीलाल ओस्वाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने दोन लार्ज कॅप इंडेक्स फंड बाजारात आणले आहेत. 'मोतीलाल ओस्वाल निफ्टी 50 इंडेक्स फंड' आणि 'मोतीलाल ओस्वाल निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड' अशी या नव्या फंडांची नावे आहे. या दोन्ही फंडाचा एनएफओ 3 डिसेंबरला खुला झाला असून त्याची अंतिम मुदत 17 डिसेंबर 2019 ही आहे. निफ्टी 50 आणि निफ्टी नेक्स्ट 50 या भारतातील दोन लोकप्रिय निर्देशांकावर हे दोन्ही नवे इंडेक्स फंड आधारलेले आहेत. 'गुंतवणूकदारांच्या गरजा लक्षात घेऊन छोट्यात छोटी म्हणजे अगदी 500 रुपयांपासूनची गुंतवणूक करता यावी हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन आम्ही हे दोन फंड बाजारात आणले आहेत. आमच्या इंडेक्स फंडांना गुंतवणूकदार आणि गुंतवणूक सल्लागार या…

‘भारत बॉण्ड ईटीएफ’ला मंत्रिमंडळाची मान्यता

भारत बॉण्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड किंवा ईटीएफ सुरू करण्याला मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. कॉर्पोरेट बॉण्ड ईटीएफ स्वरूपाची ही देशातील पहिलीच योजना आहे. सरकारी मालकीच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे हे बॉण्ड्स इश्यू केले जातील. डेट म्युच्युअल फंडांप्रमाणेच या योजनेत गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.  'भारत बॉण्ड ईटीएफ'साठी ए ए ए चे रेटिंग निश्चित करण्यात आले आहे. कमीत कमी 1 हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह तीन ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. नाबार्ड, एनएचपीसी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आरईसी, नेशनल हाउसिंग बैंक, इंडियन रेल्वे फायनान्स  कॉर्पोरेशन, पॉवरग्रीड, बीपीसीएल, इंडियन ऑइल, कोंकण रेल्वे, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक…

End of content

No more pages to load

Close Menu