एनपीएसधारकांना दिलासा

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आधीच चिंताक्रांत असणाऱ्या गुंतवणूकदारांना आणि नॅशनल पेन्शन योजनेच्या (एनपीएस) खातेधारकांना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) दिलासा दिला आहे. पीएफआरडीएच्या आदेशानुसार करोनाशी संबंधित उपचारांच्या खर्चासाठी अंशतः रक्कम काढता येणार आहे. या संदर्भात पीएफआरडीएने सर्व संबंधित गुंतवणूकदार आणि एनपीएस खातेधारकांना उद्देशून एक निवेदन जाहीर केले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने करोनाला एक गंभीर आणि प्राणघातक आजार असल्याचे म्हटले असल्याने त्याच्या उपचारासाठी गुंतवलेलली रक्कम काढण्याची सवलत खातेधारकांना देण्यात आली  आहे.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड

मागील दीड वर्ष मिडकॅप गुंतवणूकदारांसाठी वावटळीचे वर्ष ठरले. ५ जानेवारी २०१८ रोजी गाठलेल्या शिखरानंतर मिडकॅप निर्देशांकाचा माघारी प्रवास सुरू झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी हे लार्जकॅप निर्देशांक नवीन शिखरे पादाक्रांत करीत असताना एस अँड पी बीएसई मिडकॅप निर्देशांकांचा मागील २३ महिन्यांतील प्रवास नकारात्मक राहिल्याने गुंतवणूकदारांची मिडकॅपकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अजून सकारात्मकतेचा अभाव दिसून येत आहे. मिडकॅप समभागांच्या सध्याच्या किमतीचा विचार केला तर पाच पैकी तीन समभागांच्या किमती त्यांच्या ऐतिहासिक शिखरापासून अजून किमान १७ ते २० टक्के खाली आहेत. जोखीम घेण्याची मानसिकता आणि नकारात्मक परतावा दिसला तरी किमान पाच वर्षे गुंतवणुकीशी वचनबद्धता राखल्यास ही घसरण संपत्ती निर्मितीची एक संधी आहे. मिडकॅप समभागातील अस्थिरतेवर…

संधी केव्हा घ्यावी ??

शेअर बाजारात या आठवड्यात थोडेफार चढ-उतार झाले असले तरी हा बाजार सध्या उच्चांकी पातळीवर आहे. अशी उच्चांकी पातळी गाठली गेली की सर्वसामान्यांमध्ये या बाजाराविषयी आकर्षण वाढू लागते. अशावेळी या बाजारात अनेक गुंतवणूकदार हे नवीन गुंतवणूक करावी की नाही या विवंचनेत दिसतात. परंतु, बाजाराची वाटचाल ही कायम अनिश्‍चित असते. बाजार खाली येण्याची वाट पाहू आणि मग गुंतवणूक करू, असे म्हणणारे बाजारात पैसे गुंतवू शकलेले नाहीत व दुसरीकडे बाजारानेही नवनवे उच्चांक प्रस्थापित करणे थांबविलेले नाही. त्यामुळे बाजाराचा अंदाज लावण्यात वेळ घालवू नये, हेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते. आगामी काळात बाजारात 'करेक्‍शन' अथवा नफेखोरी नक्कीच होऊ शकते, परंतु अशावेळीसुद्धा अनेक कंपन्यांचे शेअर हे गुंतवणुकीची…

IPO

आज शेवटचा दिवस 'हॅथवे केबल अँड डेटाकॉम'ची उपकंपनी 'जीटीपीएल हॅथवे'च्या प्राथमिक समभाग विक्रीला(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) 21 जून रोजी सुरुवात होत आहे. यापुढे 23 जूनपर्यंत चालणाऱ्या विक्रीसाठी कंपनीने प्रतिशेअर 167 ते 170 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. प्रस्तावित योजनेत, कंपनी 240 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री करणार आहे. याशिवाय, 'ऑफर फॉर सेल'द्वारे 1.44 कोटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. यापैकी जीटीपीएल हॅथवेची पालक कंपनी हॅथवे केबल अँड डेटाकॉम 72 लाख शेअर्सची विक्री करणार आहे. हॅथवेकडे कंपनीच्या 50 टक्के अर्थात 4.92 कोटी शेअर्सची मालकी आहे. आयपीओतून मिळालेल्या भांडवलाचा उपयोग प्रामुख्याने कर्जाच्या परतफेडीसाठी केला जाणार आहे. याच्या खरेदीसाठी dmat account आवश्यक असून मागणीपत्र…

केंद्र सरकारकडून प्रसिद्ध

सध्या केंद्र सरकारद्वारे बऱ्याच वेगवेगळ्या वस्तूंवर उत्पादन शुल्क, अतिरिक्त उत्पादनशुल्क, अतिरिक्त सीमा शुल्क वगैरे नावांनी वेगवेगळे कर आकारले जात आहेत आणि सेवांवर सेवाकर आकारला जातो.आता फक्त एकच "जीएसटी' प्रत्येक "वस्तू' आणि "सेवे'वर आकारण्यात येणार आहे. केंद्र व राज्याद्वारे एकच कर आकारण्यात येणार असल्याने, एकीकृत राष्ट्रीय बाजारपेठेचा रस्ता मोकळा होईल. शिवाय वस्तूवरील करांचे प्रमाण कमी होणार असल्याने ग्राहकांना लाभ होईल. सध्या या करांचे प्रमाण 25 ते 30 टक्के आहे. "जीएसटी' लागू झाल्यावर भारतीय उत्पादक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करू शकतील. आर्थिक विकासावरही याचा सकारात्मक प्रभाव पडेल. राज्यघटनेत "जीएसटी'संबंधित सर्व महत्त्वपूर्ण मुद्यांवर (करांच्या दरांसहित) निर्णय घेण्याचे सर्वाधिकार "जीएसटी' परिषदेला आहेत. परिषदेच्या…

सेबीतर्फे मंजुरी — नवे IPO

भांडवली बाजार नियंत्रक 'सेबी'ने एमएएस फायनान्शियल सर्व्हिसेस आणि भारत रोड नेटवर्क्सला प्राथमिक समभाग विक्रीसाठी(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) मंजुरी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांनी साधारणपणे फेब्रुवारी ते मार्चदरम्यान सेबीकडे अर्ज(डीआरएचपी) सादर केले होते. बिगर बँकिंग वित्तीय कंपनी एमएएस फायनान्शियल सर्व्हिसेस प्रारंभिक विक्रीतून 550 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. या योजनेअंतर्गत कंपनी 307.4 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री करणार असून, विद्यमान भागधारकांच्या सुमारे 242.6 कोटी रुपयांच्या शेअर्सची ऑफर फॉर सेलद्वारे विक्री करणार आहे. श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सचा उपक्रम 'भारत रोड नेटवर्क लि.,' प्राथमिक समभाग विक्रीदरम्यान 29.30 लाख इक्विटी शेअर्सची विक्री करणार आहे. कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य दहा रुपये आहे. लवकरच आयपीओसाठी किंमतपट्टा निश्चित…

नवीन येणारा IPO

CDSL चा IPO १९ जून २०१७ पासून खरेदीसाठी उपलब्ध होणार असून तो २१ जून २०१७ पर्यंत खरेदीसाठी खुला राहणार आहे. या IPO च्या एका लॉट ची किंमत रु. ११३/- ते रु. ११५/- ठेवण्यात आली असून १३० शेअर्सची लॉट साईझ आहे. *तारखेमध्ये बदल होऊ शकतो.

काय करू नये??

एक चांगला गुंतवणूकदार केवळ चांगली गुंतवणूकच करत नाही तर तो चूका टाळतो, गुंतवणूकीच्या नावाखाली चालणा-या ट्रॅपमधे फसत नाही, भुलथापांना बळी पडत नाही व अभ्यासपूर्ण निर्णय घेतो. पण केवळ इतकेच पुरेसे नाही. अनेकदा गुंतवणूकदार मानसीक चुका करतात ज्यामूळे नुकसान करून घेतात. ह्यासाठी काय करू नये ह्याची ही सूची : नवीन गुंतवणूकदारासाठी IPO हाच उत्तम व कायमस्वरूपी पर्याय आहे कंपन्यांना आपले शेअर्स किती मूल्याने विकायचे आहे याचा अधिकार असल्याने IPO तील खरेदीत आपल्या अपेक्षेएवढा फायदा होताच विक्री करणे उचित.  माझ्या ब्रोकरने टीप दिली आहे! शेवटी ब्रोकर हा माणूस आहे, चूक होऊ शकते. टिप देताना ब्रोकरने कधी दिली व तुम्हाला ती कधी मिळाली,…

आदर्श पोर्टफोलिओ

पोर्टफोलिओमधे खूप वैविध्य असेल तर फायदा होतोच असे नाही. योग्य सल्लागाराकडून पोर्टफोलिओ बनवून घेतल्यास चांगल्या प्रमाणात प्राप्ती होऊ शकते. खालील पोर्टफोलिओ पहा : फ्युचर्स आणि ऑप्शन्स या मार्केटचे वैशिष्टय म्हणजे कमी पैसे असताना १०% ते १५% मार्जिनवर आपण शेअर्सचे लॉट खरेदी करू शकतो व आपला फायदा द्विगुणीत होऊ शकतो. खरेदीच्या पवित्र्याला Long Position व विक्रीच्या पवित्र्याला Short Position म्हणतात. महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ह्या पोझिशन्स ऑटो स्क्वेअर ऑफ होऊ शकतात. ह्या व्यवहारामधे लागणारे कर बरेच कमी आहेत.

भारतातील प्रमुख १० म्युचुअल फंड व त्यांची गंगाजळी..

सध्या ४२ फंड कंपन्या कार्यरत असून दहा हजार पेक्षा जास्त योजना कार्यान्वित आहेत. मार्च २०१८ अखेर २३.५ लाख कोटी रुपये यामधे गुंतवणूक आहे! २०२० पर्यंत यामधे दरसालात २०% जास्त वाढ अपेक्षित असून ही एकूण रक्कम ३० लाख कोटी रुपये होऊ शकते हा अंदाज आहे.

End of content

No more pages to load

Close Menu