अदानी समूह —
अदानी समूहाने बुधवार रात्री अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ रद्द केल्याची घोषणा केली. यानंतर शेअर बाजारात खळबळ उडाली आणि अदानी समूहाचे शेअर्स धराशायी झाले. दरम्यान, गुरुवारच्या सत्राबद्दल बोलायचे तर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुरुवारीही मोठी घसरण पाहायला मिळत असून दुपारपर्यंत अदानी एंटरप्रायझेसचे समभाग १३.५८% किंवा १८९ रुपयांनी घसरून १,८३९ रुपयांवर व्यवहार करत होते. तर अदानी पॉवरच्या शेअरला पाच टक्क्यांचे लोअर सर्किट लागले. याशिवाय अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल आणि अदानी ग्रीनचे समभाग १०-०१ टक्क्यांनी लोअर सर्किटवर पोहोचले. त्याच वेळी, अदानी विल्मरच्या समभागात ५ टक्क्यांनी लोअर सर्किट दिसून आले.