शेअरखानकडे खाते उघडल्यावर आपण वस्तू बाजारातसुद्धा उलाढाल करू शकतो . हा व्यवहार प्रत्यक्ष वस्तू न घेता केला जातो .
सोने , चांदी , तांबे , याचबरोबर गहू सोया , क्रूड ,या व अश्या प्रकारच्या सर्व वस्तू खरेदी व विक्री करून होणारा फायदा आपल्या बँक खात्यात वर्ग होऊ शकतो.
सोने, चांदी या धातूंची खरेदी करताना प्रत्यक्ष होणाऱ्या पूर्ण रकमेपेक्षा 4% ते 5% मार्जिन देऊन आपण ही खरेदी करू शकतो. तसेच तांबे, निकेल, जस्त अॅल्युमिनियम यासाठीसुद्धा आहे.
समजा आपण १ किलो सोने रु. २९००० प्रति दहा ग्रॅम या दराने घेतले व त्याचा दर रु. 50 ने वाढला तर आपल्याला रु. 500 फायदा होतो. दरवाढताक्षणी आपण विक्री केल्यास हा फायदा आपल्या खाती जमा होतो. क्रूड, सोने, चांदी यांच्या दारामध्ये दर मिनिटागणिक बदल होत असल्याने आपण या ठिकाणी खरेदी व विक्री यांचा व बाजारातील स्थितीचा विचार करून नफा करून घेऊ शकतो.
या ठिकाणी ब्रोकरेज सुध्दा कमी लागते. फक्त खरेदी करताना लॉट साईझ पाहून खरेदी करणे आवश्यक ठरते.
सकाळी १० ते रात्री ११.३० पर्यंत इथे व्यवहार करता येतात !!