आजच अंदाज

आजचे अमेरिकी बाजाराचे संकेत खराब असले तरी आशियायी बाजारांची सुरवात खरेदी होत आहे असे दर्शवित आहे !! अर्थात भारतीय बाजार आज थोडीफार खरेदीची raly दर्शवितील असे वाटते !! stock specific घ्यावेत हा सल्ला !!

एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंटला 243 कोटींचा नफा

एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 243 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. मागील वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या नफ्याच्या तुलनेत एचडीएफसी एएमसीच्या नफ्यात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 195.1 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. एचडीएफसी एएमसीच्या व्यवस्थापनाखालील एकूण गुंतवणूक डिसेंबरअखेर 3 लाख 29 हजार 100 कोटी रुपयांवर पोचली आहे.    31 डिसेंबर 2017 अखेर कंपनीच्या व्यवस्थापनाखालील गुंतवणूक 2 लाख 93 हजार 300 कोटी रुपये इतकी होती. कंपनीच्या एकूण उत्पन्नात 7.61 टक्क्यांची वाढ ते 532.94 कोटी रुपयांवर पोचले आहे. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे

प्रभात डेअरी कंपनीची 1700 कोटीला विक्री

अतिशय आक्रमक मार्केटिंगचे तंत्र अवलंबत अल्पावधीत लोकप्रिय झालेली 'प्रभात डेअरी' आपला संपूर्ण मिल्क प्रोसेसिंग व्यवसाय फ्रांसच्या लॅक्टेलीस या कंपनीला विकणार आहे. यासाठी प्रभात डेअरी आणि लॅक्टेलीसची भारतातील उपकंपनी असलेल्या तिरुमाला मिल्क प्रॉडक्ट्स यांच्यामध्ये 1700 कोटींचा व्यवहार झाला असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी वाढून 110 रुपयांवर व्यवहार करत होता. नियामक संस्था सेबी आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया कडून परवानगी मिळाल्यानंतर हा व्यवहार पूर्णत्वास जाईल.

आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाद्वारे ‘बाल भविष्य योजना’ लॉंच

आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाने 'बाल भविष्य योजना' हा एक नवा चिल्ड्रन्स फंड बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड फंड आहे. या फंडासाठी लॉक-इन कालावधी किमान पाच वर्षांचा किंवा अपत्याचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यतचा असणार आहे. यातील जी अट आधी पूर्ण होईल ती स्वीकारली जाणार आहे. हा एनएफओ 22 जानेवारी 2019 ला खुला होणार असून 5 फेब्रुवारी ही त्याची अंतिम मुदत आहे. या फंडाचे व्यवस्थापन अजय गर्ग आणि प्रणय सिन्हा करणार आहेत. या फंडातील गुंतवणूक, गुंतवणूकीच्या वेळेस 18 वर्षांपेक्षा वयाने कमी असणाऱ्या अपत्याच्याच नावे करता येता आहे. ज्याचे नावे गुंतवणूक केली जाणार आहे त्या अपत्याचे प्रतिनिधित्व त्याचे पालक करणार आहेत.…

रिलायन्सच्या ई-कॉमर्समधील एन्ट्रीमुळे—–

मुकेश अंबानींच्या रिलायन्सची भारताच्या ई-कॉमर्समधील एन्ट्री नव्या डिजीटल वसाहतवादाला आळा घालेल, असे मत गुंतवणूक तज्ज्ञ आणि इन्फोसिसचे माजी सीएफओ टी व्ही मोहनदास पै यांनी व्यक्त केले आहे. रिलायन्सच्या ई-कॉमर्समधील एन्ट्रीमुळे वस्तूंच्या किंमती आश्चर्यकारकरित्या खाली येतील, त्याचा प्रचंड लाभ ग्राहकांना होईल. रिलायन्स ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने या व्यवसायात उतरते आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबर समीटमध्ये मुकेश अंबानींनी याची घोषणा केली आहे.  रिलायन्सकडील भांडवलाची मुबलकता, सक्षम पुरवठा, तंत्रज्ञान, उत्तम नेटवर्क आणि रिटेल क्षेत्रातील आधीपासूनचे अस्तित्व अमेझॉनसारख्या कंपन्यांसमोर तगडे आव्हान निर्माण करणार यात शंका नाही.

सरलेला आठवडा __

शेअर बाजाराच्या निर्देशांकाने शुक्रवारी सलग चौथ्या सत्रामध्ये कमाई केली. मात्र आघाडीच्या कंपन्यांचे तिमाही निकाल उत्साहवर्धक असूनही निर्देशांकाला फार लाभ होऊ शकला नाही. गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा स्वीकारल्याने निर्देशांकात केवळ १२ अंकांची भर पडली व तो ३६३८६वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा एकाच तिमाहीमध्ये १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नाची विक्रमी नोंद करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या समभागमूल्यात ४.४३ टक्क्यांनी वाढ झाली. चांगले तिमाही निकाल नोंदवणाऱ्या या कंपनीच्या समभागाला शुक्रवारी प्रचंड मागणी होती. याशिवाय, कोटक बँक, एचसीएल टेक, ओएनजीसी, एशियन पेण्टस, वेदांता, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, मारुती, टीसीएस आदी कंपन्यांचे समभागही वधारले. सन फार्मा कंपनीतील संशयास्पद आर्थिक व्यवहारांविषयी प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर या कंपनीचा…

सन फार्माची सेबीकडे धाव

औषध निर्माण क्षेत्रातील सन फार्माने भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडे धाव घेतली आहे. काही व्यक्‍ती आणि कंपन्यांकडून सन फार्माची जाणुनबुजून बदनामी करून भागधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप सन फार्माने केला आहे. त्यामुळे तातडीने या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान आणखी एका जागल्याने "सन फार्मा"तील गैरकारभार उघड केल्याने कंपनीच्या शेअर्सला जोरदार फटका बसला आहे. शुक्रवारी (ता.18) बाजारात सन फार्माचा शेअर नऊ टक्‍क्‍यांनी घसरला.   कंपनीने सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांना लिहीलेल्या पत्रात काही व्यक्ती आणि कंपन्यांकडून सन फार्माची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सेबीने तातडीने लक्ष घालण्याची मागणी कंपनीने केली आहे.…

‘विप्रो’चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा

भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 1,931 कोटी रुपये होता. कंपनीने बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनी 1:3 बोनस शेअर देणार आहे. म्हणेजच विप्रोच्या 3 शेअरवर आणखी एक शेअर बोनस मिळणार आहे. समजा गुंतवणूकदाराकडे 3 शेअर असतील तर त्याला आणखी एक शेअर मिळणार आहे. याचबरोबर कंपनीने दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरसाठी एक रुपया लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने एक नवा विक्रम केला

मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने एक नवा विक्रम केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 10,251 कोटी रुपयांचा दणदणीत नफा मिळवला आहे. 10,000 कोटी रुपयांचा निव्वळ नफा एकाच तिमाहीत मिळवणारी रिलायन्स ही देशाच्या खासगी क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे. रिलायन्सच्या नफ्यात 8.82 टक्क्यांची वाढ झाली आहे. याआधीच्या सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीने 9,516 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त नफा रिलायन्सने कमावला आहे.

तज्ञ म्हणतात —

 डिसेंबर 2018 अखेर इएलएसएस प्रकारातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत 27 टक्क्यांची घसरण झाली आहे. डिसेंबर अखेर इएलएसएसमध्ये 841 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली होती. तर डिसेंबर 2017 अखेर इएलएसएसमधील गुंतवणूक 1,166 कोटी रुपयांवर होती. अॅम्फीने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. मागील वर्षभरात शेअर बाजारात सुरू असलेले चढउतार, अस्थिरतेचे वातावरण यामुळे इक्विटी प्रकारात चांगला परतावा मिळालेला नाही. याचा परिणाम इएलएसएसमधील गुंतवणूकीवरही झाला आहे. इएलएसएस प्रकारातील गुंतवणूक मुख्यत: करबचतीच्या उद्देशाने केली जाते. 'इक्विटीचा परतावाच नकारात्मक असल्यामुळे मागील वर्षभरात या प्रकारातून गुंतवणूकरदारांना अपेक्षित असलेला परतावा मिळू शकलेला नाही. त्याचबरोबर मागील वर्षभरात मुदतठेवींच्या व्याजदरांमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ झालेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या प्रकारातील गुंतवणूक कमी केलेली…

End of content

No more pages to load

Close Menu