डिपॉझिटरी म्हणजे सिक्युरिटी (शेअर्स वगैरे मधील गुंतवणुक) जतन करणारी सुविधा. भारतात डिपॉझिटरी ही अशी संस्था आहे जी बेनिफिशियल ओनर्सच्या सिक्युरिटी एका नोंदणीकृत डिपॉझिटरी पार्टीसिपंटद्वारा (डीपी) इलेक्ट्रॉनिक स्वरुपात जतन करते. डिपॉझिटरी सर्वसाधारणपणे एखाद्या कमर्शिअल बँकेसारखच काम करते. डिपॉझिटरी सेवांचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराला नोंदणीकृत डीपीद्वारा एक खाते उघडावं लागतं.

डीमाटेरिअलायझेशन ही अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे मूर्त कागदोपत्री सर्टिफिकेट्सचं परिवर्तन इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये होतं.

ज्या व्यक्तीच्या नावे खातं उघडलं जातं आणि त्यानुसार सीडीएसएलकडे जिचं नाव नोंदवलं जातं, ती व्यक्ती.

गुंतवणूकदारांना डीपॉझिटरी सेवा देण्याची अधिकृत परवानगी लाभलेला डीपॉझिटरीचा एजंट, तसेच डिपॉझिटरी द्वारा निर्दिष्ट गरजांची पूर्तता करणाऱ्या वित्तीय संस्था, बँका, कस्टोडियन्स आणि शेअरब्रोकर्स डीपी म्हणून नोंदणी करू शकतात.

इश्यूअर म्हणजे सिक्युरिटी जारी करणारी कोणतीही संस्था.

आर.टी.ए म्हणजेच “रजिस्टर ट्रान्सफर एजंट” होय. हा सिक्युरिटी जरी करणाऱ्या संस्थेचा एजंट असतो. हा एजंट (दलाल) सिक्युरिटी जरी करणाऱ्या संस्था आणि डिपॉझिटरी यांच्यामध्ये डिमाटेरिअलायझेशन, रिमटेरिअलायझेशन, पुब्लिक ऑफर आणि कॉर्पोरेट अॅक्शन यासारख्या सेवा देण्यासाठी मध्यस्थीचे काम करतो.

आयएसआयएन (इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटीफिकेशन नंबर) म्हणजे एखाद्या सिक्युरिटीला डिपॉझिटरी यंत्रणेमध्ये दाखल करून घेताना सेबीने तिला दिलेला परिचयात्मक क्रमांक.

क)   डिमॅट खाते उघडणे.

ख)   डीमाटेरिअलायझेशन मूर्त कागदोपत्री सिक्युरिटींचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात परावर्तन.

ग)    रिमटेरिअलायझेशन, म्हणजेच एखाद्या बिओच्या खात्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटिंच्या बॅलान्सेसचे मूर्त स्वरुपामध्ये परिवर्तन करणे.

घ)    इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील सिक्युरिटींचं रेकॉर्ड ठेवणे.

ङ)     बिओच्या डिमॅट खात्यामधून / खात्यांमध्येअसलेल्या सिक्युरिटी देऊन / स्वीकारून व्यवहार पूर्ण करणे.

च)    एश्यूअर्सद्वारा आयपीओ किंवा अन्य मार्गे देऊ करण्यात आलेल्या सिक्युरिटिंची इलेक्ट्रॉनिक माध्यमातून डिमॅट खात्यात जमा करायची व्यवस्था करणे.

छ)   रक्कम देणे असल्यास किंवा घेणे असल्यास अथवा या दोन्ही प्रक्रिया मध्ये डिमॅट खात्यावर निर्बंध लावणे.

१)     डिपॉझिटरी कायदा, १९९६

२)     सेबी

३)     सी.डी.एस.एल. बाय-लॉज

४)     प्रिवेनशन ऑफ मनी लॉडरींग कायदा, २००२

क)   सेबीने बहुतांश सर्वच सूचीबद्ध स्क्रिप्समधील व्यवहारासाठी डिमॅट पद्धतीने सौदा पूर्ण करणे सक्तीचं केलं आहे.

ख)   सिक्युरिटी मूर्त स्वरुपात धारण करण्याच्या तुलनेत सिक्युरिटी धारण करण्याचा हा व्यवहार अधिक सुरक्षित व सोयीस्कर आहे.

ग)    डिमॅट स्वरुपात हस्तांतरण करण्यात येणाऱ्या सिक्युरिटींना कोणतेही कोणतेही मुद्रांक शुल्क लागत नाही.

घ)    सिक्युरिटींचं तात्काळ हस्तांतरण घडल्याने रोखीकरणक्षमत वाढते.

ङ)     डीपीच्या एका सूचनेवरून कंपन्यांकडील नोंदीमाधील पत्ते बदलणे, पॉवर ऑफ अॅटर्नी नोंदवणे / बदलणे वगैरे कामं पार पडतात.

च)    एकाच डिलिव्हरी ऑर्डरने कितीही सिक्युरिटींचं हस्तांतरण / वितरण शक्य होतं.

छ)   सिक्युरिटींवार कमी मर्जीन / कमी व्याजाने कर्ज मिळवणे सुलभ होते.

होय. गुंतवणूकदार एक डिमॅट खात असतानाही सीडीएसएलकडे दुसरं डिमॅट खत उघडू शकतो.

सीडीएसएलच्या डीपीद्वारा डिमॅट खत उघडण्याची प्रक्रिया अगदी सरळ आणि सोपी आहे. बॅंकेत खत उघडावं तशीच ही प्रक्रिया आहे.

होय,सेबीने दिलेल्या नियमानूसार ज्या गुंतवणूकदारांचे पूर्वीपासून डिमॅट खाते आहे तसेच जे गुंतवणूकदार नवीन डिमॅट हाते उघडत आहे त्या सर्वांना त्यांच्या पॅनकार्डची ओरिजिनल (मूळ प्रत) संपूर्ण माहिती आपल्या डीपीला देणे गरजेचे आहे.

कंपन्या ‌‍डिविडन्ट / इंटरेस्ट वॉरंट ज्या वेळेला पाठवतात त्यावर गुंतवणूकदाराचे नाव असते आणि त्यामुळे या गोष्टी कोणा दुसर्याच्या हातात लागू नये अथवा हरवू नये यासाठी डिमॅट खाते उघडताना बँकेची संपूर्ण माहिती देणे गरजेचे आहे.

होय अल्पवयीन व्यक्ती डिमॅट खाते उघडू शकते. ती अल्पवयीन व्यक्ती प्रौढ होई पर्यंत ते खाते त्या अल्पवयीन व्यक्तीचे पालक हाताळू शकतात उदा. आई आणि वडील आणि जर का त्या व्यक्तीचे आई आणि वडील नसतील तर न्यायालय त्या व्यक्तीचे खाते हाताळण्यासाठी योग्य पालकाची नियुक्तू / ठरऊ शकते.

नाही. अल्पवयीन व्यक्ती डिमॅट खातेसाठी संयुक्त होल्डर म्हणून राहू शकत नाही.

नाही. अल्पवयीन व्यक्ती डिमॅट खातेसाठी संयुक्त होल्डर म्हणून राहू शकत नाही.

जी संस्था पब्लिक ट्रस्ट अॅक्ट; १८६० / सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट / बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट यासारख्या अॅक्टमध्ये रजिस्टर असेल तर त्या ट्रस्ट (संस्था) ला डिमॅट खाते उघडता येते.

नाही; जर एखादा संयुक्त खातेदार मरण पावला तर नविन संयुक्त खाते जीवंत असणाऱ्या खातेदाराच्या नावाने काढता येते आणि अगोदरच्या खात्यामधील शेअरचे ते त्यांच्या नविन खात्यामध्ये स्थलांतरित करू शकतात.

नाही, एकदा संयुक्त खातेदाराचे डिमॅट खाते उघडले कि त्यात नवे नमूद करणे / फेरबदल करणे / रद्द करणे या मान्यता नाही.

होय, वैयक्तिक खातेदार त्याच्या खात्यातील शेअर संयुक्त खातेदाराच्या खात्यात देऊ शकतो.

एच.यु.एफ म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब पद्धती होय. अश्या खात्यांमध्ये डिमॅट खाते हे कुटूंबाच्या सिक्युरिटीजची व्यवस्था हाताळते. सिक्युरिटीजच कामकाज हा “कर्ता” पाहतो जो पुरुष असतो आणि इतर सदस्य हे “को-पर्सन्स” म्हणून ओळखले जातात. करता हा इतर सदस्यांच्या वतीने खात्याची सर्व देखरेख करतो.

नाही, एच.यु.एफ हे वारसदार निवडू शकत नाही.

कर्ता हाच फक्त खाते उघडण्याच्या अर्जावर एच.यु च्या शिक्क्यासहीत स्वाक्षरी करतो.

एन.आर.आय आपले डिमॅट खाते सीडीएसएलच्या कोणत्याही डीपीकडे उघडू शकतात. पण खाते उघडताना डीपीकडून मिळालेल्या अर्जावर “एन.आर.आय” हे नमूद करणे तसेच “रिपॉट्रिएबल” नमूद करणे गरजेचे आहे.

नाही, एन.आर.आय व्यक्तीला डिमॅट खाते उघडण्यासाठी आर.बी.आयची कोणत्याही प्रकारची परवानगी घ्यावी लागत नाही.

नामांकनाची सुविधा डिमॅट खात्यात उपलब्ध असते. सर्व व्यक्ती / एन.आर.आय / विदेशी राष्ट्रीय बिओस सर्वाना आपल्या नामांकनाची / वारसदाराची सर्व माहिती स्वतःच्या डीपीकडे देणे गरजेचे असते.

होय, नामांकन केल्यानंतर गरजेनुसार त्यात फेरबदल करता येतात.

होय, संयुक्त खात्यामध्ये नामांकन करू शकतो पण सर्व खातेदारांना एकाच व्यक्तीचे नामांकन द्यावे लागते.

पॉवर ऑफ अटर्नि म्हणजे अशी व्यक्ती ज्याला डिमॅट खातेदार स्व:ताचे खाते हाताळण्याचे हक्क / अधिकार देतो.

डिपॉझिटरी अॅक्ट १९९६ च्या अनुसार, गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स मूर्त वा इलेक्ट्रॉनिक ह्यापैकी कोणत्याही स्वरुपात बाळगू शकतात. तथापि, सेबीने असा अध्यादेश काढला आहे की बहुतांश सर्व सूचीबद्ध सिक्युरिटींच्या सौध्यांची पूर्तता ही डिमॅट पद्धतीमध्ये व्हावी. ५०० शेअर्सपर्यंतचा व्यवहार जरी मूर्त स्वरुपात करण्याला अनुमती असली तरीही सह्या न जुळणे, सह्यांमधील फसवणूक, बनावट सर्टिफिकेट्स वैगेरे कारणांमुळे हाती सुपूर्द केले जाणारे शेअर्स कितपत अस्सल असतील अशी धास्ती वाटून मूर्त स्वरूपातील व्यवहार करायला सहसा कुणी राजी होत नाही.

कोणतीही मूर्त स्वरूपातील सिक्युरिटी डीमाटेरिअलाइझ करण्यासाठी, आपल्या पसंतीच्या डीपीकडे डिमॅट अकाऊंट उघडावा लागतो. त्यानंतर फक्त एक डीआरएफ (डिमॅट रिक्वेस्ट फॉर्म) भरायचा आणि आपल्याकडचे शेअर्स / सिक्युरिटी सर्टिफिकेट्स ही डीमाटेरिअलायझेशनसाठी डीपीकडे सुपूर्द करायचे. डीपी ही सर्टिफिकेट्स डिफेस करतो आणि संबंधित इश्युअर्स / रजिस्टरकडे रवाना करतो, जे सीडीएसएलकडे उघडलेल्या डिमॅट खात्यात तेवढयाच संखेच्या सिक्युरिटी जमा करतात. प्रत्येक स्क्रीपसाठी एक स्वतंत्र डीआरएफ वापरावा.

नियमानुसार डिमाटेरीअलायझची विनंती गेल्यानंतरच्या तारखेपासुन २१ दिवसाच्या आत ते सिक्युरिटीझ डिमाटेरीअलायझ होतात.

सिक्युरिटींच्या डिमाटेरीअलायझेशनसाठी सीडीएसएल आपल्या डीपीकडून जरी कोणताही चार्ज आकारत नसली तर डीपी मात्र पोस्टेज / कुरियर चार्जेससह डिमाटेरीअलायझेशन चार्ज घेतात.

स्टॉक एक्स्चेंजमधील ब्रोकर द्वारा केल्या जाणाऱ्या आणि क्लीअरिंग कॉर्पोरेशन / क्लीअरिंग हाउसद्वारा पूर्तता केल्या जाणाऱ्या, सिक्युरिटींच्या कोणत्याही खरेदी व विक्री व्यवहाराला ‘ऑन मार्केट’ व्यवहार असं म्हणतात.

कोणत्याही ब्रोकरला मध्ये न घालता आणि क्लीअरिंग कॉर्पोरेशन / क्लीअरिंग हाउस ह्यांना अंतर्भूत न करता दोन बीओंमध्ये ज्या व्यवहाराची परस्परच पूर्तता केली जाते, त्याला ‘ऑफ मार्केट’ व्यवहार असं म्हटलं जातं.

ज्यांची डिमॅट खाती एकाच डिपॉझिटरीची नाहीत अशा दोन पार्टींमध्ये होणाऱ्या व्यवहाराला ‘इंटर डिपॉझिटरी’ व्यवहार असं म्हटलं जातं.

वरीलपैकी कोणत्याही एखाद्या व्यवहारांसाठी बिओला “डी.आय.एस.” स्लिप म्हणजेच “डेबिट इन्स्ट्रक्शन स्लिप” भरून डीपीला द्यावी लागते.

“डि.आय.एस.” ने बाजारातील व्यवहार, ऑफ मार्केट व्यवहार तसेच ऑन मार्केट व्यवहार इत्यादी प्रकारचे पुर्ण करता येतात. स्वतंत्र डि.आय.एस. हा प्रत्येक व्यवहार पुर्ण करण्यासाठी लागतो.

 • डीपीकडून इन्स्ट्रक्शन स्लिप आवर्जून मागून घ्या.
 • इन्स्ट्रक्शन स्लिपवर क्रमांक अगोदरच छापलेले असल्याची आणि डीपीने इन्स्ट्रक्शन स्लिप बुकलेटची दखल घेतल्याची खात्री करून घ्या.
 • डिमॅट खात्याच्या क्रमांकाचा शिक्का अगोदरच मारला असल्याचं बघून घ्या.
 • इन्स्ट्रक्शन स्लिपवर केवळ एकच एंट्री केलेली असल्यास, गैरवापर टाळण्यासाठी उर्वरित जागेवर काट मारा.
 • टार्गेट अकाउंट आयडी, प्रमाण, आयएसआयएन वैगेरे सर्व तपशील बिओने स्वतःच इन्स्ट्रक्शन स्लिपवर भरून दाखला करावा.
 • ऑन मार्केट / ऑफ मार्केट / इंटर डिपाझिटरी जबाबदाऱ्या / हस्तांतरण निश्चित करण्यासाठी तसेच डिलिव्हरी आणि रिसीट इन्स्ट्रक्शनसाठी स्वतंत्र इन्स्ट्रक्शन स्लिप्स वापरल्या गेल्याची खात्री करून घ्यावी.
 • संयुक्त खात्यासाठी, सर्व खातेधारकांनी इन्स्ट्रक्शन स्लिपवर सही सही करणे जरुरीचे आहे.
 • इन्स्ट्रक्शन स्लिपच्या दोन प्रती तयार करा व इन्स्ट्रक्शन स्लिपच्या दुसऱ्या (डुप्लिकेट) प्रतीवर डीपीची पोच / मिळाल्याचा शिक्का मारून घ्या व ती प्रत तुमच्याकडे जपून ठेवा.
 • इन्स्ट्रक्शन स्लिप वापरात नसताना कडीकुलुपात योग्य बंदोबस्तात ठेवा. त्यातून गहाळ झाल्यास / भलतीकडे ठेवल्याने सापडेनाशा झाल्यास डीपीला त्यासंबंधी ताबडतोब कळवावं.
 • कोरी इन्स्ट्रक्शन स्लिप कधीही सही करून ठेवू नका.
 • इन्स्ट्रक्शन स्लिपवर कोणतीही फेरफार, दुरुस्ती, वा खाडाखोड करायची झाल्यास त्याच्या पुष्ट्यार्थ सर्व धारकांनी सही करणं अगत्याचं आहे.

सिक्युरिटीज गहाण ठेवणे म्हणजे, सिक्युरिटीज न विकता त्यावर कर्ज / निधी उपलब्ध करून घेणे होय. यामध्ये बिओला ‘प्लेजर’ असे तर जो कर्ज उपलब्ध करून देतो त्याला ‘प्लेजी’ असे म्हणतात

डिमॅट सिक्युरिटी डिमॅट स्वरुपात गहाण ठेवता येतातच, शिवाय बिओला कमी केलेल्या मार्जीनने व व्याज दराने कर्जाची अधिक रक्कम मिळणेही शक्य होते. डिमॅट स्वरूपातील सिक्युरिटी गहाण ठेवण्याची प्रक्रिया ही गहन ठेवणारा व गहन ठेऊन घेणारा ह्या दोघांसाठीही अधिक सोयीची असते.

सर्वसाधारणपणे लाभांश / व्याज ह्यांचं वितरण, राईट्स / बोनस जारी करणे, कंपन्या विलीन / विभक्त होण्यामुळे धारित सिक्युरिटींचे एकत्रीकरण वा नव्या सिक्युरिटी जरी करणे, अंशतः चुकात्या करण्यात आलेल्या सिक्युरिटींची रक्कम मागणे, पुनखारेदी / खुली ऑफर वैगेरे उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी लाभ मिळवण्याकरिता आणि धारणेची पात्रता निश्चित करण्याकरिता इश्युअर कॉर्पोरेट अॅक्शनचे आयोजन करतो.

कॉर्पोरेट अॅक्शन दोन मुख्य प्रकारात विभागली गेली आहे रोख आणि बिन रोख कॉर्पोरेट अॅक्शन:-

रोख कॉर्पोरेट अॅक्शनमधील गुंतवणूकदारांना कॅशच्या स्वरुपात फायदे मिळतात.

उदा. व्याजाचे / डिवीडन्डचे पेमेंट

बिन-रोख कॉर्पोरेट अॅक्शनमधील गुंतवणूकदारांना सिक्युरिटीजच्या स्वरुपात फायदे मिळतात. उदा. बोनस ईशु, राईट इशु. इ.

रोखीच्या वा बिना-रोखीच्या कॉर्पोरेट लाभांच्या संदर्भात कोणतीही विवादास्पद स्थिती उद्भवल्यास गुंतवणूकदाराने इश्युअर / रजिस्ट्रर ह्यांच्याशी थेट संपर्क साधावा.

कंपनी जेव्हा प्रॉस्पेक्ट्सद्वारा जनतेसाठी शेअर्स जारी करते तेव्हा त्याला ‘आयपीओ’ असं म्हणतात. आयपीओना अॅलॉट केलेल्या शेअर्सच क्रेडिट गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात थेट डिमॅट स्वरुपात केलं जाऊ शकतं.

आपल्याला देण्यात आलेल्या सिक्युरिटी ख्त्यात जमा झाल्यात ना, ह्याची शहानिशा बीओ खालिल प्रकारे करू शकतात.

क)   बीओंना देऊ करण्यात आलेले शेअर्स त्यांच्या खात्यात जमा झाल्याच्या संदर्भात कंपनी बीओंना “अॅलॉटमेंट अॅडवाइस” पाठवते.

ख)   डीपीने पाठवलेल्या खात्याच्या स्टेटमेंटवरून.

ग)    सिडीएसएलच्या इंटरनेट सुविधेसाठी बीओंनी नोंदणी केली असल्यास “इलेक्ट्रोनिक अॅक्सेस टू सिक्युरिटीज इन्फर्मेशन” (ईझी) द्वारा.

आयपिओ संबंधातील सर्व चौकश्या कंपनीकडे वा रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजान्त्कडे पाठवाव्यात, ज्यांचा तपशील अर्जाच्या मासुध्यातून / ऑफर दस्तैवजातून उपलब्ध होऊ शकेल.

खाते धारकांच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसाला नामांकन केलेल्या सिक्युरिटीचं हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला ‘ट्रान्स्मिशन’ असं म्हटलं जातं. जर सिक्युरिटीज संयूक्त खात्यामध्ये असतील तर त्यावेळेस जिवंत असणारा दुसरं खातेदार हा त्या सिक्युरिटीजचा मालक असतो.

खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसाला नामांकन केलेल्या सिक्युरिटींचं हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला ‘ट्रान्स्मिशन’ म्हटलं जातं. डिमॅट खात्यातील सर्व सिक्युरिटींच्या ट्रान्स्मिशनचे सोपस्कार हे डीपीकडे आवश्यक टी कागदपत्रे दखल करून पूर्ण होण्यासारखं असल्यामुळे डिमाटेरीअलायझ्ड स्वरूपातील सिक्युरिटींचं ट्रान्स्मिशन ही एक सोपी प्रक्रिया ठरते.

अशा प्रकारचा दावा सांगणाऱ्या व्यक्तीने संबंधित डीपीकडे ट्रान्स्मिशन रिक्वेस्ट फॉर्म (टीआरएफ) मध्ये अर्ज करून, पुराव्यादाखल खालील दस्तावैज जोडावेत.

क)   एकट्या खातेधारकाने नामांकन करून कुणाला नियुक्त केलेले असल्यास या खातेधारकाच्या मृत्युप्रसंगी मृत्युच्या दाखल्याची नोटरीकडे नोंदवलेली प्रत.

ख)   एकट्या खातेधारकाने नामांकन करून कोणाचीही नियुक्ती केलेली नसल्यास, त्या खातेधारकाच्या मृत्यूप्रसंगी:

१)     मृत्युच्या दाखल्याची नोटरीकडे नोंदवलेली प्रत.

२)     खाली उल्लेखलेल्यांपैकी कोणताही एक दस्तावैज

१)     वारसा प्रमाणपत्र

२)     मृत्युपत्र आणि वारासापात्राची प्रत

३)     लेटर ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनची प्रमाणित प्रत

ग)    अर्ज अस्सल असल्याचं कळल्यानंतर डीपी, दावा करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर सिक्युरिटींचं हस्तांतरण करील.

डिमाटेरीअलायझ केलेल्या सिक्युरिटीच्या बाबतीत मुख्य फायदा हाच आहे कि एकट्या डीपीशी पत्रव्यवहार करून डिमॅट खात्यातील सिक्युरिटींच्या ट्रान्स्मिशनचे सोपस्कार पूर्ण होतात.