संपत्ति निर्मिती, उत्पन्न प्राप्ती व भांडवल संरक्षण अशा तीन मुलभूत स्वरूपाचे म्युच्युअल फंड उपलब्ध असतात, व त्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप, सेक्टरिअल फंड, बॉंड फंड, डेप्ट फंड व हायब्रीड फंड असे अनेक प्रकार फंड घराणी उपलब्ध करून देतात.

म्युच्युअल फंड घराण्यांची असेट मॅनेजमेंट कंपनी या संबंधातील रेकॉर्ड ठेवत असून त्यावर सेबीचे नियंत्रण असते.

शक्यतो लवकरात लवकर पण स्वतःच्या पहिल्या पगारापासून सुरुवात करावी.

संपत्ति निर्मिती, ध्येय पूर्ती, टॅक्स बचत व निवृत्ती नियोजन यासाठी म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करावी.

जागतिक स्तरावर ९० वर्षे झाली असून, भारतात पहिला म्युच्युअल फंड सुरु होऊन ५० वर्षे झाली आहेत.

कमीत कमी दरमहा रु. ५०० पासून पुढे कितीही गुंतवणूक करता येते.

गुंतवणूकीवर सातत्याने लक्ष ठेवल्यास कोणताही फंड धोकादायक होत नाही.

नजीकच्या फंड अॅडव्हायजरशी चर्चा करून आपण याविषयी निर्णय घेऊ शकतो.

स्मार्ट फोन अॅपद्वारे, इंटरनेट किंवा अन्य अनेक मार्गांनी माहिती मिळवू शकता.

आपले ध्येय निश्चित करून फंड निवडणे आवश्यक असते.

बॉंड फंड, गव्हरमेन्ट सेक्युरिटी फंड, ट्रेजरी अॅडव्हान्टेज फंड, फ्लोटिंग रेट फंड हे डेप्ट फंडचे प्रकार आहेत.

सेबीच्या नियमानुसार फंड घराण्यांवर कुठे गुंतवणूक करावी याचे नियंत्रण असते.

ओपन एंड फंड मधील केव्हाही व क्लोज एंड फंड मधील मुदत संपल्यानंतर. रिकव्हेस्ट पाठविल्यानंतर कामाच्या दोन दिवसात आपले पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतात.

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही शेअर मार्केटशी संबंधित गुंतवणूक असल्यामुळे जागतिक घडामोडींचा तसेच देशांतर्गत घडामोडींचा परिणाम होऊन म्युच्युअल फंडामधे घट किंवा वाढ होते, याची माहिती सामान्य माणसाला नसते म्हणून असे लिहिलेले असते.