तुमच्या जीवनाच्या व संपत्तीच्या बाबतीतील पुष्कळसे धोके हे जीवनविमा प्रकारात संरक्षित केले जातात. काही ठराविक जीवनविमा योजना :-
- युनिट लिंक जीवन वीमा योजना
- मुदत / मुदत ठेव अधिक मूल्य परतावा योजना
- आरोग्य वीमा
- वैयक्तिक अपघात वीमा
- घर/कार इत्यादींसाठी वीमा
- तुमच्या घरच्यांना कर्जापासून सुरक्षित करण्यासाठीचा वीमा
- प्रवास वीमा
जीवन विमा हा गुंतवणुकीसाठी पर्याय नाही, पण काही व्यक्ती त्याच कल्पनेने अनेक प्रकारच्या Policies एजंटच्या सांगण्यावरून घेताना दिसतात. यामधे जर गुंतवणूक म्हणून विमा घेतला गेला असेल तर सर्वसाधारणपणे त्याव्दारे ५% ते ६% च परतावा मिळतो, पण
आपण अपेक्षा करीत असलेल्या आर्थिक संरक्षणाच्या दृष्टीकोनातून “टर्म प्लान” घेणे अत्यंत चांगले आहे.
टर्म प्लानमध्ये हप्त्यापाई भराव्या लागणाऱ्या रकमेचा काहीही परतावा मिळत नाही, पण हप्त्याची रक्कम अत्यल्प असू शकते. आपले उत्पन्न राहणीमान गृहकर्जाची रक्कम व वाहन कर्ज याचा विचार करून आपले काही बरे वाईट झाल्यास आपले कुटुंबीय सध्याच्या स्थितीत आपला चरितार्थ चालवितील एवढ्या रकमेचा टर्म प्लान असणे अत्यावश्यक आहे.
काही गृहकर्ज वितरीत करणाऱ्या कंपन्या आपल्या कर्ज रकमेचा कर्जदाराचा विमा उतरवितातच.
उदाहरणार्थ-
समजा ३० वर्षाच्या एका व्यक्तीने १ कोटी रुपयांचा २० वर्षांचा जीवन विमा घेतल्यास त्याला साधारणपणे दरमहाचा हप्ता रू. २०००० /- पडू शकतो व काही कारणास्तव ह्या व्यक्तीचे नोकरीपाई मिळणारे उत्पन्न एखाद्या वर्षासाठी बंद झाल्यास हप्ते न भराल्याने Policy बंद पडू शकते किंवा दंडात्मक कार्यवाही करून सुरु करावी लागेल किंवा हप्त्याची रक्कम मित्र मंडळीकडून उसनी घेऊन भरणे आवश्यक असते. दरमहा रु. २००००/- उसने घेणे हे कदाचित कठीण होऊ शकेल.
पण, ह्याच व्यक्तीने जर १ कोटी रु.चा टर्म प्लान घेतल्यास हप्त्याची रक्काम दरमहा फक्त ३०० ते ५००रु. पेक्षाही कमी येते व अचानक काही कारणास्तव काही दिवसांसाठी उत्पनामधे आडकाठी आल्यास ही हप्त्याची रक्कम कशाही प्रकारे व्यवस्था करून भरणे शक्य असते व त्यापाई Policy बंद होणे / दंडात्मक कार्यवाही होणे या बाबी टाळल्या जाऊन विम्याचे छत्र बिनदिक्कत सुरु राहते.
विम्याची ऑनलाइन खरेदी स्वस्त असते व ग्राहक थेट कंपनीकडे असल्यामुळे मध्यस्थांचे जे कमिशन वाचते त्याचा फायदा कंपनी थेट ग्राहकालाच देते व यामधे भरलेली माहिती अचूक असल्याने कंपनी विम्याची रक्कम देण्यामध्ये टाळाटाळही करत नाही.
LIC संदर्भातील कोणत्याही योजनेसाठी आपण LIC विमा प्रतिनिधीशी संपर्क साधावा
ULIP किंवा तत्सम म्युच्युअल फंड आधारित योजनेसाठी प्रदीप जोशी यांचेशी संपर्क साधणे उचित !!