आय. पी. ओ. म्हणजे …Initial Public offer —

एखादी सेबी नोंदणीकृत कंपनी आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल उभारण्याकरिता पैसे शेअर्स विक्री करून उभे करण्याचे ठरवते.ह्या प्रकाराला IPO म्हणतात. पूर्वनियोजित कालावधीत ही विक्री केली जाते. त्यानंतर ठराविक दिवशी ह्याचे listing केले जाते , व ह्यानंतर ह्या शेअर्सचा व्यवहार सुरु होतो .

IPO चा अभ्यास केल्याशिवाय यामध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते .नवीन कंपनी चा IPO खरेदी करण्यापूर्वी मान्यवर सल्लागाराकडून त्यासंबंधी माहिती घ्यावी . त्यापेक्षा  अस्तित्वातील कंपनीचा IPO घेणे फायदेशीर असू शकतो.

यासाठी कोणत्याही DP कडे demat व tarding अकौंट असावे लागते , तसेच आपले बँक खाते ASBA या स्वरूपाचे असणे बंधनकारक आहे.

Application Supported by Blocked Amount म्हणजे ASBA होय . सध्या बर्याच बँक्स ही सेवा देत आहेत .

नवीन येणारे आय. पी. ओ. :

१)रेल्वेने सार्वजनिक क्षेत्रातील चार मोठ्या कंपन्यांच्या शेअर बाजारातील नोंदणीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. रेल्वेने आता  आयआरएफसी, रि-टीईएस आणि इरकॉन या चार कंपन्यांचे शेअर बाजारात नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. डिसेंबर महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात या चारही कंपन्या सेबीकडे ‘सेबी’कडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स(डीआरएचपी) दाखल करण्याची शक्यता आहे. रेल्वेचे चारही आयपीओ ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आता  आहे.

२)भारतात नैसर्गिक गॅस विक्रेता कंपनी असलेली ‘महानगर गॅस लिमिटेड’ची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) चालू महिन्यात होण्याची शक्यता आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून रु.1200 कोटींचे भांडवल उभारणार आहे.

3)भारत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील चार कंपन्यांमधील हिस्सा विक्री करण्याचा विचार करत आहे. संरक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कंपन्यांमधील 25 टक्के हिस्सेदारी प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) विकण्याची योजना आहे.

४)नाशिक येथील सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील कंपनी आर. एम. ड्रिप अँड स्प्रिंकलर्स सिस्टिम लिमिटेडने शेअर बाजारातून भांडवल उभारणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी कंपनी आयपीओ आणणार असून त्याची नोंदणी राष्ट्रीय शेअर बाजारात होणार आहे.

 

        • बरेचसे NFO close ended या स्वरूपाचे असतात.
        • L& T / Tata capitals /UTI यांचेही NFO उपलब्ध आहेत.
        • 80 C साठी अनेक फंड घराणी वेगवेगळ्या प्रकारचे NFO विक्रीसाठी उपलब्ध करून देत असतात .
        • सध्या उपलब्ध NFO पहा !!

          

टीप : – सामान्यपणे ज्यांना बँकेतील FD पेक्षा जास्त व्याज पाहिजे असते पण जोखीम घ्यायची इच्छा नसते त्यांना NFO मधील गुंतवणूक निश्चीत जास्त परतावा देते व यामध्ये TDS उद्गम्स्थानी होत नाही !!

Close Menu