शेअर्स व म्युच्युअल फंडातील करसवलत
कलम ८० सी नुसार ELSS मध्ये गुंतवणूक केल्यास १.५० लाख रुपयापर्यंत वजावाट मिळते. फक्त ही गुंतवणूक किमान तीन वर्षासाठी ठेवणे आवश्यक आहे. या गुंतवणूकीत भरीव वाढही होते. व NSC, बँक एफ डी, पेक्षा यामधील गुंतवणूक कमी कालावधीत आपण काढू शकतो. सर्व फंड घराणी आपले ELSS फंड विक्रीसाठी वेळोवेळी खुले करत असतात.
शेअर्स व म्युच्युअल फंडातील लभांश
म्युच्युअल फंड व शेअर्स वरील मिळणारा रु. १० लाख पर्यंतचा लाभांश हा करमुक्त आहे. त्यापुढील लाभांशावर १०% कर भरावा लागतो.
डेट फंड
हा फंड खरेदी केल्याच्या तारखेपासून ३६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावरील नफा हा दीर्घ मुदतीचा होतो व कमी कालावधीतील नफा हा लघु मुदतीचा नफा होतो. या फंडामध्ये STT वजा होत नसल्याने हा नफा करपात्र आहे. या नफ्यावर कर वाचवायचा असल्यास कलम ५४ एफ किंवा ५४ इसी नुसार गुंतवणूक करता येते.
खाजगी कंपन्यांचे शेअर्स
हे खरेदी केलेल्या तारखेपासून २४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर मिळणारा नफा हा दीर्घ मुदतीचा असतो व त्यावर २०% कर भरणे आवश्यक आहे. या नफ्यावर कर वाचवायचा असल्यास कलम ५४ एफ किंवा ५४ इ सी नुसार गुंतवणूक करता येते.