स्टॉक एक्सचेंज एक अशी संस्था आहे जेथे रोख्यांच्या संबंधात खरेदी-विक्री तसेच यांना पूरक असे व्यवहार चालतात. जनसामान्यांकडून कंपनीसाठी लागणारे भांडवल उभारण्याची परवानगी रोखे बाजारातून प्राप्त होत असते आणि अश्या पब्लिक कंपन्यांच्या शेअरची देवाण-घेवाण करण्याची मुभा दुय्यम बाजारात असते.

रोखे म्हणजे अशी आर्थिक उत्पादने, ज्यांना शेअर, रोखे, ऋणबंध, असे म्हणतात व हे कंपनी किंवा व्यापारी संस्था किंवा शासनाचे देखील असू शकतात. म्हणूनच स्टॉक एक्सचेंज असा मंच उपलब्ध करून देतात, जेथे या सर्व रोख्यांची विक्री व अन्य प्रकारचे व्यवहार पूर्ण होतात. प्रांतीय स्टॉक एक्सचेंज हे फक्त त्या प्रांताकरीता मर्यादित असते, तर राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज संपूर्ण देशासाठी खुले असते.

भारतीय रोखे आणि विनियम संस्था (सेबी) ही १९९२ मध्ये गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय संसदेने स्थापन केली. जेणे करून बाजारावर निर्बंध व विकास साधण्यास मदत होईल. शासनाच्या १९८८ च्या परिपत्रकानुसार या संस्थेच्या कामास प्रारंभ झाला. या संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे असून प्रांतीय कार्यालये दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई आणि अहमदाबाद येथे आहेत.

सेबी संस्थेच्या नियमानुसार, ज्या कंपन्यांना जनसामान्यांकडून भांडवल कंपनीसाठी उभे करावयाचे आहे. अशा कंपन्यांना स्वतःच्या सर्व आर्थिक बाबींची माहिती जाहीर करणे आवश्यक असते. या शिवाय एका निश्चित कालखंडानंतर लोकांच्या माहितीसाठी कंपन्यांनी आपली संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी लागते. एखाद्या वेळेस दुसऱ्या कंपनी सोबत विलीनीकरण अथवा अधिग्रहण झाले, तर सेबीने घालून दिलेले नियम पाळावे लागतात. जेणे करून शेअरधारकांच्या हितास सुरक्षित करता येईल. stock एक्सचेंज मध्ये शेअर खरेदी विक्री ही दलाला मार्फत होत असते. हे दलाल तेव्हाच काम करू शकतात जेव्हा ते सेबी संस्थेत पंजीबद्ध असतील आणि त्यांच्यापाशी सेबी संस्थेचा परवाना असेल. गुंतवणूकदारांच्या हिताची सुरक्षितता ठेवण्यासाठी त्यांनां सेबीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त सेबी संस्था बाजारात सहभागी होणाऱ्या उप-दलाल, जमा संस्था, संपत्ति प्रबंधन करणारे व्यक्ती, व्यापारी बँकावर  देखील सेबीचे नियंत्रण असते. या म्युच्युअल फंडांना त्यांच्या योजनांची माहिती तर प्रकाशित करावीच लागते शिवाय ते कुठे पैसा गुंतवीत आहे, गुंतवणूकदारांना किती अधिभार लागणार हे सर्व प्रकाशित करावे लागते. गुंतवणूकदारांच्या हितासाठी वेळोवेळी होणारे बदल देखील सेबीनियमानुसार  जाहीर करणे यांना भाग असते.

भारतातील स्टॉक एक्सचेंजेस

आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि भारतातील हे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज असून, व्यवहारांची संख्या बघितल्यास जगातील हे तिसरे मोठे एक्सचेंज म्हणून गणले जाते.

राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज हे दैनंदिन व्यवहाराच्या बाबतीत हे भारतातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे.

एमसीएक्स एस एक्स (MCX-SX) हे स्टॉक एक्सचेंज नुकतेच भारतात स्थापन करण्यात आलेले आहे. हे सर्व एक्सचेंज मुंबईत आहेत. याशिवाय काही प्रांतीय एक्सचेंजेस देखील आहेत. परंतु NSE, BSE आणे MCX-SX हे असे बाजार आहेत जेथे भारतातील सर्वात जास्त व्यवाहार होतात.

जमा संस्थेची प्रक्रिया (DEPOSITARY SYSTEM)

जेव्हा आपण शेअर मधे गुंतवणूक करतो, तेव्हा आपणास सर्वप्रथम शेअरचे डीमॅट स्वरूप समजणे गरजेचे आहे. कारण की आजकाल सर्वप्रकारचे शेअर डीमॅट स्वरूपात असतात. या पूर्वीच्या प्रकारात शेअर भौतिक स्वरूपात म्हणजेच प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिले जायचे. जे की आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिले जातात. या करता आपणास या जमा संस्थेची प्रक्रिया समजणे गरजेचे आहे.

जमा संस्थेमधे गुंतवणूकदारांचे शेअर, ऋणपत्र, रोखेबंध, शासकीय रोखे, म्युचुअल फंडाचे युनिट इत्यादी सर्व इलेक्ट्रॉनिक स्वरूपात गुंतवणूकदारांच्या आवेदना नंतरच पंजीबद्ध जमा शाखांमधे ठेवता येतात. या शाखा विविध प्रकारच्या व्यवहारांमधे देखील आपल्या सेवा पुरवितात. यांना आपण एखाद्या बँकेसमानच मानु शकतो. जे की जामाकार्त्याचे पैसे सांभाळतात.

सध्या भारतात दोन जमा संस्था काम करतात. ज्या की सेबी संस्थेत पाजीबध्द आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय रोखे जमा संस्था (NSDL) आणि दुसरी मध्यवर्ती रोखे जमा संस्था (CDSL).

शंका समाधान

  1. नवीन गुंतवणूकदारासाठी IPO हा उत्तम पर्याय आहे : कंपन्यांना आपले शेअर्स किती मूल्याने विकायचे आहे याचा अधिकार असल्याने IPO तील खरेदीत आपल्या अपेक्षेएवढा फायदा होताच विक्री करणे उचित.
  2. माझ्या ब्रोकरने टीप दिली आहे : शेवटी ब्रोकर हा माणूस आहे, चूक होऊ शकते.
  3. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुंतवणूक : तांत्रिक विश्लेषणासाठी Softwares उपलब्ध असतात, त्यांचे गणित किंवा तंत्र प्रत्यक्ष बाजारात तग धरू शकत नाही.
  4. कंपनीचा तीमाही नफा वाढलेला आहे : तिमाही नफ़्यापेक्षा सातत्यपूर्ण कामगिरी महत्वाची.
  5. माझे भांडवल परत मिळेपर्यंत मी शेअर विकणार नाही : शेअर खरेदी केल्यावर सातत्याने खाली येऊ लागल्यास विक्री करणे उचित असते.