डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट उघडण्यासाठी
- पॅन कार्ड
- आधार कार्ड (Address Proof)
- चेक बुक
- बँक अकाउंट
- फोटो
- नॉमिनी फोटो व pan कार्ड
म्युचुअल फंड व डिमॅट मधील कोणत्याही गुंतवणुकीवर आपण एका क्लिकवर नजर ठेऊ शकता.
शंका समाधान
वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली व भारतीय नागरीकत्व असलेली कोणीही व्यक्ती.
कंपनीचे शेअर्स, फ्युचर्स व ऑप्शन्स, वस्तू (कमोडिटी), म्युच्युअल फंड, IPO खरेदी व ETF (एक्स्चेंग ट्रेडेड फंड).
नाही. एकाच खात्यावरील पत्ता, बँक, इमेल, दूरध्वनी, व सही हे बदल विशिष्ट फॉर्म भरून करता येतात.
कंपनी शेअर्स व फ्युचर्स आणि ऑप्शन्स यासाठी वेगवेगळे ब्रोकरेज आहे.
इंट्राडेसाठी ०.१०% हे व डिलिव्हरी साठी ०.५०% ब्रोकरेज असून आपल्या एकूण व्यवहारानुसार हे अजूनही कमी होऊ शकते.
शेअरखान वेबसाईट, ट्रेडटायगर, किंवा शेअरमोबाईल अॅपव्दारे व्यवहार करता येतो. याचे डेमोसुध्दा पाहता येतात. तसेच ऑनलाईन ट्रेनिंग सुध्दा पाहता येते व सर्व मोफत आहे.
आपल्या खरेदीच्या ऑर्डर्स व दर सुधारता येतात.
खातेदार खरेदी करताच आपला संभाव्य तोटा हा कमीत कमी होण्यासाठी ब्रॅकेट ऑर्डर्सचा वापर करू शकतो.
बँकेतून ऑनलाईन किंवा NEFT करून किंवा नजीकच्या शाखेत चेक देऊन पैसे भरणे सहज सुलभ आहे. तसेच ट्रेडिंग खात्यातील पैसे म्युच्युअल फंडामध्ये सुध्दा ऑनलाईन ट्रान्स्फर करता येतात.
हो! अनेक डिमॅट खाती देखील उघडता येतात. आपल्या खात्यावर असलेल्या शेअर्सच्या किमतीवरसुध्दा नव्याने खरेदी करता येते.
मिनिमम बॅलंस काही नसला तरी चालतो फक्त डेबिट असू नये. डेबिटवर ‘डिले पेमेंट चार्ज’ लागतो.
आपल्याला उपलब्ध असलेले सर्व कंपन्यांचे कोणतेही म्युच्युअल फंड सहज घेता येतात. त्यासाठी SIP, Flexi SIP, One Time Purchase हे पर्याय आहेत. तसेच खरेदी केलेले म्युच्युअल फंड SWITCH किंवा REDEEM करणे शक्य असते. SIP- Report, Portfolio Report, हे कोणत्याही वेळी वेबसाईट व्दारे पाहणे शक्य आहे.
म्युच्युअल फंड खरेदी हे RTA मोड व MFSS मोड या दोन मोडमधून करता येते.
हे पाहून त्यांची खरेदीही याच खात्याव्दारे करणे शक्य आहे.
आपले यापूर्वी घेतलेले फिजिकल म्युच्युअल फंड सुध्दा या खात्यात ट्रान्स्फर करून घेता येतात व सर्व व्यवहार एका छत्राखाली नियमित करणे सुध्दा शक्य आहे.
आपले यापूर्वी घेतलेले फिजिकल म्युच्युअल फंड सुध्दा या खात्यात ट्रान्स्फर करून घेता येतात व सर्व व्यवहार एका छत्राखाली नियमित करणे सुध्दा शक्य आहे.
या सर्व ठिकाणी गुंतवणूक केल्यावर काही तांत्रिक अडचण उद्भवली तर प्रत्येक म्युच्युअल फंडाने त्यांचा स्वतःचा तक्रार निवारण कक्ष ठेवला आहे. त्यामध्ये सुध्दा आपल्याला दाद न मिळाल्यास आपण केंद्रशासनाच्या Investor Education & Protection Fund (www.iepf.gov.in) या संकेतस्थळावरून दाद मागू शकता! या संकेतस्थळावर भाषा निवडीची सुलभता सुध्दा आहे.