ही म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची अतिशय सोपी व शिस्तबध्द पद्धत आहे. दीर्घवधीत भरपूर पैसा जमविण्यासाठी ही योजना चांगली असते. एकदम गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा अशा प्रकारे गुंतवणूक केली असता अतिशय चांगले परतावे प्राप्त होतात. आवर्ति ठेव योजने प्रमाणेच यात देखील एक ठराविक किमतीच्या वरती युनिट विकून सहा महिन्यांच्या काळात तुम्हाला नफा प्राप्त होणार. एक ठराविक रक्कम निश्चित काळानंतर नियमितपणे म्युच्युअल फंडात भरली जाते. बाजारातील चढ उतारांवर दुर्लक्ष करून अशा योजना प्रत्येक महिन्यात युनिट खरेदी तुम्हाला करू देतात. तुमची गुंतवणूक तितकीच राहते, फक्त बाजार खाली असेल, तर त्या पैशात जास्त युनिट मिळतील अथवा वरती असेल तर कमी युनिट मिळणार. त्यामुळे एकदा का या विकल्पाची निवड केली, तर तुमचा बाजारातील बाजारातील सहभाग तसाच वाढतो. पध्दतशीर गुंतवणूक योजना ही पैसा व किंमत यांच्या सरासरीच्या तत्वावर अवलंबून असते. या पध्दतीमुळे युनिटची सरासरी किंमत ही सरासरी बाजार मूल्याच्या पेक्षा कमी राहण्यास मदत होते. जर आपली गुंतवणूक सातत्यपूर्ण असेल तरच हे संभव होते. पध्दतशीर गुंतवणुक योजना ही रु. ५०० प्रति महिन्यापासून चालू होवून जास्तीत जास्त रु. २५,००० पर्यंत नेता येते. पैसे ECS (ELECTRONIC CLEARING SERVICE) या माध्यमातूनही भरता येतात.

या प्रकाराचा एक जास्तीचा फायदा हाच की बाजारातील चढ उतारांवर आपल्याला विचार करायची वेळ ना येता, पैसा सरळ गुंतविला जातो. जर तुम्ही, एक ठराविक रक्कम प्रत्येक महिन्यात गुंतवीत असाल, समजा रु. ५०० जेव्हा बाजार वरती असेल तेव्हा त्या फंडाची एकूण मालमत्ता किंमत (NAV) सुध्दा जास्त राहील, त्यामुळे त्या महिन्यात तुम्हाला कमी युनिट मिळतील व जर बाजार खालती असेल, तर त्याच रु. ५०० जास्त युनिट मिळतील. कारण एकूण मालमत्ता किंमत खालती राहील.

 

म्युचुअल फंडापैकी सर्वात जुन्या युटीआय या म्युचुअल फंडाच्या काही महत्वाच्या योजनांमधे दरमहा रु. ५००० गुंतविल्यास किती परतावा मिळाला आहे याचा सोपा तक्ता सोबत आहे तो पहावा आपण कोठे गुंतवणूक करावी याचा निर्णयही स्वतः घ्यावा.

दरमहा गुताविलेली रक्कम – रु. ५०००/-
कालावधी

एकूण गुंतवलेली रक्कम (रु.)
३ वर्षे

1,80,000
परतावा (%)
५ वर्षे

3,00,000
परतावा (%)
UTI Transportation and Logistics Fund - Growth2,30,03117.286,13,73729.76
UTI Mid Cap Fund- Growth2,26,89116.275,59,46125.79
UTI Banking Sector Fund-Growth2,26,72116.224,53,31816.92
UTI Balanced Fund- Growth2,14,45912.204,26,60214.39
UTI Children’s Carrier Plan Balanced Plan 2,13,93012.024,21,51713.89
UTI MNC Fund- Growth2,13,53611.894,78,24819.16
UTI RBPF Fund2,11,65011.254,02,96212.03
UTI Infrastructure Fund- Growth2,11,14511.084,22,40913.98
UTI Long Term Equity Fund (Tax Saving)- Growth2,10,84810.984,27,68814.49
UTI CCP Advantage Fund- Growth2,10,30910.804,24,33114.17
UTI Dividend Yield Fund- Growth2,08,31110.124,05,96212.34
UTI Top 100 Fund- Growth2,07,4559.834,20,12313.75
UTI Mahila Unit Scheme- Growth2,06,6669.563,87,95310.47
UTI ULIP2,06,1919.403,90,61510.75
UTI Mastershare- Growth2,04,4188.794,13,99613.15
UTI Equity Fund- Growth2,03,4178.444,22,25713.96
UTI India Lifestyle Fund- Growth2,01,5467.793,94,88611.20
UTI Nifty Fund- Growth1,99,6447.133,89,16510.59
UTI Bluechip Flexicap Fund- Growth1,99,2526.993,99,49011.67
UTI Opportunities Fund- Growth1,98,5656.753,95,10511.22
UTI Spread Fund- Growth1,98,2366.633,57,6687.14
INCOME CATEGORY
UTI Gilt Advantage Fund- L T P- Growth2,19,39213.844,05,51512.29
UTI Dynamic Bond Fund- Reg.- Growth 2,14,71812.293,97,96911.52
UTI Bond Fund- Growth2,13,14411.763,89,49110.63
UTI- MIS- Advantage Fund- Growth2,09,05310.383,97,41911.46
UTI Income Opportunities Fund- Growth2,08,25510.11N/AN/A
UTI Monthly Income Scheme- Growth2,07,7259.933,84,25110.08
UTI Short Term Income Fund-Reg.- Growth2,06,0519.353,78,1859.42
UTI Floating Rate Fund- STP- Growth2,04,1468.703,73,0598.86
UTI G-Sec Fund- STP- Growth2,03,8818.613,70,2508.55
UTI Treasury Advantage Fund- Reg.- Growth2,03,0028.303,69,9708.52
UTI Money Market - Ret- Growth 2,00,2067.323,62,9587.73