निवृत्त लोकांसाठी एक अत्यंत सुंदर व आश्वासक योजना

निवृत्त लोक किंवा ज्यांना दरमहा खर्चासाठी काही रक्कम कायमस्वरूपी आवश्यक आहे अश्या गृहिणी किंवा तत्सम लोकांसाठी ही एक चांगली योजना आहेअश्या वर्गातील सर्वंजण साधारणतः पोस्टातील MIS कडे आपली ठेव ठेवून दरमहा मिळणारे  व्याज खर्चासाठी वापरणे पसंत करतात. परंतू सदरील योजनांमधे गुंतवणूक केलेले मूळ भांडवल काही वाढत नाही, किंबहून त्याचे अवमूल्यनच होते. शिवाय त्यामध्ये जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येते यावर निर्बंध आहेत अश्याच काही योजना नव्या अर्थसंकल्पात जाहीर झाल्या आहेत.

SWP मध्ये किती रक्कम ठेवावी यावर निर्बंध नाहीत .

म्युच्युअल फंडांच्या balance fund मध्ये आपण एकरकमी रक्कम दीर्घ कालावधीसाठी ठेवणे निश्चित   करून त्यामधून दरमहा साधारणपणे % पर्यंत व्याज रक्कम बँकेत वळती करण्याची सूचना फंड हाउसला दिल्यास ठराविक तारखेला आपल्या बँक खात्यात ही रक्कम जमा होऊ शकतेपण त्याचबरोबर मूळ रक्कमेमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ होत असते व हाच ह्या योजनेचा मुख्य  फायदा आहे.

असे फंड दीर्घ कालावधीसाठी १२% पेक्षा जास्त परतावा देतात!!

UTI चा wealth builder fund व ICICI pru चेही balance fund यासाठी वापरणे शक्य आहे !

- वानगीदाखल खालील उदाहरण पहा -

UTI balance fund (GROWTH) मध्ये सन २००० जानेवारी मध्ये रू 25,००,०००/ – ठेवले व त्यातून दरमहा रू १६००० खर्चासाठी काढल्यास saptember २०१६ मध्ये आपली एकूण स्थिती खालीलप्रमाणे होईल .

  • जानेवारी २००० मध्ये ठेवलेली रक्कम : रू २५,००,०००/-
  • दरमहा काढलेली रक्कम : रू ३१,३३,३९६ /-
  • फंडाची सध्याची किमत : रू १,१६,८८,७९४/-

म्हणजेच दरमहा रक्कम घेऊनही मुळ रक्कम साधारणतः चौपट झाली आहे. चला तर आपणही SWP साठी सुरवात करूया! अधिक माहितीसाठी कार्यालयीन पत्त्यावर संपर्क करा…