आजकाल सामान्य नोकरदार सुध्दा भरघोस पगारामुळे Income Tax भरणा करण्याच्या छत्राखाली येवू शकतो. गेल्या वर्षी किंवा याही वर्षी करभरणा करण्याच्या स्लॅबमध्ये भरघोस सवलत मिळेल असे वाटत होते पण…
इन्कम टॅक्स सर्वांना सध्याच्या नियमानुसार 80 C अंतर्गत रु. १.५० लाख पर्यंत काही विशिष्ठ योजनेमधे गुंतवणूक केल्यास करा सवलत मिळते. सर्व साधारणपणे बरेचसे लोक घाईघाईत हे रु. १.५० लाख विमा योजना(LIC), सार्वजनिक भविष्य निधी (PPF), पोस्ट ऑफिसच्या बचत योजना व बँकेच्या फिक्स डीपॉझीट मधून ही गुंतवणूक करतात. पण या बचतीतून म्हणतो तेवढा परतावा मुदतींती मिळत नाही व काही योजनांमधे तर उद्गमकर कपातही होते. सार्वजनिक निर्वाह निधीतील रक्कम हवी तशी व हवी तेव्हा काढताही येत नाही.
या दृष्टीने म्युचुअल फंडातील ELSS योजना शेअरबाजारा संबंधीत योजना असल्याने भरघोस परताव्यासह टॅक्स बचतही करून देतात. म्युच्युअल फंडाद्वारे आपण युटिआयच्या खालील योजनेमधे गुंतवणूक केल्यास धनवृद्धी चांगली होवू शकते. युटीआय तर्फे गेली अनेक वर्षे सुरु असलेल्या तीन योजना ह्या सामान्य माणसापासून दूर राहिल्या असल्या तरी त्या कारसवलतीसह भरघोस उत्पन्न देणाऱ्या योजना आहेत.
- रीटायरमेंट बेनिफिट पेंशन स्कीम
- यामधे गुंतवणुकीसाठी कमाल वयोमर्यादा नाही. निवृत्ती योजनेसाठी उपयुक्त.
- SIP द्वारे चक्रवाढीचा फायदा घेऊन संपत्ति निर्मिती होते.
- साधारणता ११% पेक्षा जास्त परतावा मुळू शकतो. उदा. रु. १०० दरमहा ३० वर्षे गुंतविल्यास रु. २० लाख पेक्षा जास्त परतावा मिळतो.
- युटीआय ULIP – युनिट लिंक इंशुरंस प्लान
- दीर्घकाळ गुंतवणुकीमुळे संपत्ति निर्माण होते.
- रु. १५ लाख पर्यंत विमा सुरक्षा व रु. ५०,००० पर्यंत अपघात विमा. वैद्यकीय तपासणी नाही.
- ४५ वर्षे ही सेवा कार्यान्वित आहे. गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा किमान १२ वर्ष ते ५५ १/२ वर्ष.
- या मधील गुंतवणूक ही ६०% डेट फंड व ४०% इक्विटी फंड मधे होते. त्यामुळे साधारणपणे ११% पेक्षा जास्त परतावा.
- ELSS – इक्विटी लिंक सेविंग स्कीम-यामध्ये पैसे केव्हाही गुंतवणे शक्य असून तीन वर्षे काढता येत नाहीत.
- UTI Long Term Advantage Fund Series V
- ही स्कीम टॅक्स सेविंग योजना आहे. कमीत कमी गुंतवणूक रु. ५०० किंवा त्या पटीत.
- यात भरलेले पैसे तीन वर्ष काढता येत नाहीत. पण त्यानंतर दहा वर्षापर्यंत केव्हाही काढता येतात. ही योजना दि. २३-०३-२०१७ पर्यंत सुरु होती. ३० मार्च २०२०नंतर पैसे केव्हाही काढता येणार.जरी हि योजना आता बंद झाली असली तरी
- याच प्रकारची नवीन योजना या वर्षात लवकरच सुरु होईल .
- यामध्ये ११% पेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. 80 C अंतर्गाताचे फायदे मिळतात.
वरील तिन्ही योजनांना TDS नाही. मिळणारा परतावा हा पूर्णतः टॅक्स फ्री आहे.