निवडक संपादकीय!

  • वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी

    विवाह हा नवदाम्पत्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असतो. आपापल्या कुवतीप्रमाणे खर्च करून हा सोहळा जास्तीत जास्त कसा चांगला करता येईल यासाठी संबंधित प्रयत्नशील असतात.

  • *लिक्वीलोन- नवीन गुंतवणूक सुविधा *

    *लिक्वीलोन- नवीन गुंतवणूक सुविधा * सध्या बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणे ही बाब सोपी झाली आहे.त्याबरोबरच *P2P लेंडिंग * हा प्लॅटफ़ॉर्मसुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने

  • ‘लिक्विड फ़ंड’ (लिफ) कसे काम करतात ?

    ‘लिक्विड फ़ंड’ (लिफ) कसे काम करतात हे जाणून घेण्याअगोदर लिफ म्हणजे काय, हे समजून घेऊया !! बऱ्याचदा अशी काही परिस्थिती उद्भवते की अचानक काही

  • नांदा सौख्यभरे !!

      गेल्या दोन महिन्यात मला आमच्या नातेवाईकांचे दोन विवाहसोहळे अगदी जवळून पाहता आले. एक विवाह त्रिवेंद्रम येथील होता तर दुसरा मुंबई येथील!! दोन्ही विवाहात

  • SIP मधून पैसे कसे काढायचे?

    एसआयपीमधून पैसे काढताना कोणते घटक लक्षात घेतले पाहिजेत? पैसे कधी काढले जावे आणि कोणत्या प्रकारचे कर आकारले जाऊ शकतात? हे आज थोडक्यात पाहूया !!

  • NPS राष्ट्रीय निवृत्ती योजना

    NPS राष्ट्रीय निवृत्ती योजना गेल्या दोन वर्षातील कोरोना कालावधीतील “वर्क फ्रॉम होम” या परिस्तिथीमुळे *आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक नियोजन * यांमध्ये लोकांच्या विचारसरणीमध्ये बराच

  • शिक्षणाचे महत्व

    शिक्षणाचे महत्व मुलांचे शिक्षण ही आपल्या आयुष्यतील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. आपल्या मुलांना जगातील उत्तम शिक्षण संस्थामध्ये शिकवायचे असेल तर आजपासून बचत आणि गुंतवणूक

  • फक्त १०००० दरमहा – बना कोट्याधीश —

    शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण असतानाही गुंतवणुकदारांमध्ये म्युच्युअल फंडची मोठी क्रेझ आहे. SIP द्वारे रिटेल गुंतवणुकदार म्युच्युअल फंडमध्ये मोठी गुंतवणूक करतान दिसत आहेत. मागील महिन्यात

  • निवृत्तजीवनाचे नियोजन–

    सेवानिवृत्त जीवनांत १५ वर्षे लोटलेले श्री देशपांडे  यांना सतावणारा मुद्दा काय? तर निवृत्तीपश्चात मिळालेला पैसा त्यांनी एका खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनेत गुंतविला होता. त्यामधून

  • आर्थिक स्वातंत्र्य

    आर्थिक स्वातंत्र्य ही अशी मानसिक स्थिती आहे जी आपण आपल्या आर्थिक स्थितीबाबत पूर्णपणे चिंतामुक्त झालो आहोत असे वाटू लागल्यावर तसेच आपण आपल्या मनात वारंवार

  • वॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-

    जगभरात गुंतवणूक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस आहे. जगातील कोट्यवधी लोक शेअर बाजारातून पैसे कमविण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा

  • आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —

    आज १५ ऑगस्ट रोजी आपण ७६ वा स्वातंत्र दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्य या शब्दात एक जादू आहे, हा शब्द शुद्ध हेवेत घेतलेल्या मोकळ्या

  • ब्लू चीप शब्द कसा आला?

    ब्लू चीप शब्द कसा आला? ब्लू चीप हा शब्द कोठून आला याची माहिती आपण अगोदर करून घेऊया. १९ व्या शतकात अमेरिकेत पोकर हा खेळ

  • टर्म इन्शुरन्स

    पन्नास लाखांचा मुदत विमा काढल्यास (टर्म इन्शुरन्स) मृत्यू झाल्यानंतर खरंच पन्नास लाख रुपये मिळतात का? टर्म इन्सुरन्सचा अर्थ प्रथम समजून घेऊया! टर्म इन्शुरन्स म्हणजे

  • एस. आय . पी. बद्दल अधिक काही —-

    म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे गुंतवणूक करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये वेळेचा फार मोठा वाटा आहे. मध्यम गुंतवणूकदार त्यांची दीर्घकालीन

  • माझी मुलगी सहा महिन्यांची आहे ! तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली ?

    तुमची मुलगी काही महिन्यांचीच आहे. जर आता पासून तुम्ही तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी चांगल्या आणि योग्य आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक केली तर तुमची चिंता दूर

  • आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार !!!

    कोरोना व्हायरसच्या चिंतेमुळे जागतिक शेअर बाजारांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. गुंतवणूकदार कमालीचे धास्तावलेले आहेत. कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीचे जागतिक अर्थकारणावर दीर्घकालीन

  • शेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते?

    डीलिस्ट हा शब्द काही दिवसांपूर्वी खूप वापरला जात असे ज्या वेळेला वेदांता कंपनी ने डिलिस्टिंग जाहीर केले व त्याची किंमत जाहीर केली परंतु त्यांचे

  • गुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात?

    जेव्हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असते तेव्हा बहुतेक वेळा सामान्य गुंतवणूकदार काय करतात? आपल्यापैकी बरेचजण प्रसिद्ध वेबसाइटवर जातात आणि म्युच्युअल फंडाची स्टार रेटिंग पाहतात.

  • दैनंदिन खर्च आटोक्यात कसा ठेवावा?

    जीवनशैली ही समाज, संस्कृती, एखादा गट किंवा काही व्यक्तींनी स्थापित केलेली आहे. यामध्ये एकमेकांसोबत वागणूक, संवाद, वस्तूंची देवाणघेवाण आणि उपभोग, कार्य, उपक्रम, आणि स्वारस्य

  • आर्थिक नियोजनाचे महत्व

    आर्थिक नियोजनाचे महत्व आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने गेली दोन वर्षे अनेकांसाठी थोडीफार कठीण ठरली आहेत. lockdown,पगार कपात, व्यवसायावरील बंधने, वैद्यकीय खर्च या कारणास्तव अनेकांना आर्थिक

  • अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी—-

    आपण काम आपली उपजीविका मिळवण्यासाठी करत असतो. पगाराचे उत्पन्न, व्यवसायाचे उत्पन्न, भाड्याचे उत्पन्न, व्याज आणि लाभांश इत्यादी उत्पन्नाची बरीच साधने आहेत. आपण अधिकाधिक उत्पन्न

  • गुंतवणुकीचा फॉर्म्युला

    मला बऱ्याचवेळा गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीचे अवलोकन करून काही बदल असल्यास सुचवा अशी विनंती करतात. अश्या गुंतवणुकीदारांच्या पोर्टफोलिओ चे अवलोकन करताना बऱ्याच वेळा असे आढळून

  • *आज व्हॅलेंटाईन डे ! *

    आज व्हॅलेंटाईन डे ! * आज आपल्या वॅलेन्टाईनला आपण नव्या स्वरूपाच्या गिफ्ट देऊन *अर्थसाक्षर * करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकायला शिकवा ! अशा वेगळ्या

  • विमा पॉलिसीवर घेता येते वैयक्तिक कर्ज

    करोनाच्या काळात अनेकांना नाजूक आर्थिक परिस्थितीतून जावे लागले. काहीजणांच्या व्यवसायावरही परिणाम झाला, तर काही लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गरज भासली. अशा परिस्थितीत

prev next

धनलाभ : गुंतवणुकिशी निगडीत प्रत्येक शंकेचे समाधान, मराठीत!

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) स्थापनेमध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा एका मराठी माणसाचा आहे ज्याचे नाव आहे रामचंद्र पाटील. ज्या NSDL मुळे शेअर मार्केटमध्ये डिलिव्हरी सोपी आणि जोखीममुक्त झाली त्या NSDL चे पहिले व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर भावे हे होते, आणि तेही मराठीच! विशेष म्हणजे त्यांनी भारतीय शासकीय सेवेतील नोकरी सोडून NSDL मध्ये जाणे पसंत केले होते. अशा दोन दिग्गज मराठी माणसांनी शेअर बाजाराला नवीन दिशा दिली आहे पण यामध्ये मराठी माणूस मात्र रिता राहिला याचे दुःखं आहे. पण आता ही परीस्थिती बदलण्यासाठी व मराठी माणसाचा सूप्त विवेक जागवण्यासाठी शेअर मार्केट व म्युचुअल फंड ह्या अर्थशास्त्र निगडीत विषयांवर “मराठीत” शास्त्रशुद्ध सल्ला देणारी ही वेबासाइट आपल्या सेवेत सादर अर्पण.

धनलाभ अॅन्ड्रॉईड अॅप!

धनलाभचे मराठी अॅन्ड्रॉइड अॅप अता गुगल प्लेस्टोअर वर देखील ऊपलब्ध असून ते वापरून तुम्ही मोबाइलवरून सिलेक्टिव्ह आर्टिकल/न्युज पाहू शकता. नेमका डेटा लोड करणारे हे अॅप माहिती पटकन लोड करते व बॅंडविड्थ वाचवते. आजच डाऊनलोड करा!

ताज्या घडामोडी...

आजचे संकेत

आजचे संकेत छान आहेत आणि आज US व UK चे बाजार बंद असल्याने भारतीय बाजात तेजीचा माहोल राहू शकतो ! IT समभागावर लक्ष असू द्यावे !! The market is likely to open marginally higher on Monday as the SGX Nifty indicates a positive start for the broader index, with a gain of 83 points after opening the session 0.62 percent...

ओला इलेक्ट्रिक 2024च्या सुरुवातीस आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत

सर्व कंपन्या वेळोवेळी त्यांचे IPO लाँच करतात. त्यामुळे जर तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल, तर लवकरच एक नवीन आयपीओ मार्केटमध्ये उतरणार आहे. भारतीय स्टार्टअप कंपनी ओला इलेक्ट्रिक, जी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरने बाजारात खूप लोकप्रिय झाली आहे, आता लवकरच तुम्हाला पैसे कमवण्याची संधी देणार आहे. ओला इलेक्ट्रिक पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ च्या सुरुवातीस आपला आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी...

हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आता विकता येणं अवघड

भारतातील बहुतेक कुटुंबांकडे सोन्याचे दागिने आहेत. अनेक जण सोन्याला संकट काळातील साथीदार मानतात. परंतु आताची बातमी ज्यांच्या घरात हॉलमार्क नसलेले केडीएम किंवा इतर सोने आहे, त्यांच्यासाठी फार चांगली नाही. घरात पडून असलेले हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आता विकता येणं अवघड झालं आहे किंवा नवीन दागिन्यांसह त्यांची देवाणघेवाण करण्यासाठीही खटपट करावी लागणार आहे. सरकारच्या हॉलमार्किंग नियमाच्या अंमलबजावणीमुळे हे संकट उद्भवले आहे....

या कंपन्या होणार बाजारातून डी-लिस्ट, शेअर्सची खरेदी-विक्री ‘बंद’

शेअर बाजारातून सात शेअर्स डिलिस्ट होणार आहेत. डिलिस्टिंग अशी एक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे सूचीबद्ध कंपनी शेअर बाजारातून काढून टाकली जाते. त्यानंतर त्या कंपनीचा शेअर्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध नसतो. प्राइम डेटाबेसच्या आकडेवारीनुसार, ७ शेअर्स शेअर बाजारातून डिलिस्ट होणार आहेत. पर्ल अपार्टमेंट्स हाऊसिंग फर्म पर्ल अपार्टमेंट्सचे डिलिस्टिंग १७ मे २०२२ रोजी उघडण्यात आले आणि आज म्हणजेच १६ मे २०२३ रोजी पूर्ण होईल. ऑफरनुसार...

कर्जदारांना मिळणार दिलासा?

पुढील महिन्यात म्हणजे जूनमध्ये होणाऱ्या आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीमध्ये (MPC) रेपो दर वाढणार की नाही? हे मे महिन्यात येणारी महागाईची आकडेवारी ठरवेल. एमपीसीच्या मागील बैठकीत दरवाढीला तूर्तास ब्रेक लावला होता, पण त्याआधी रेपो दरात सलग अनेक वेळा वाढ करण्यात आली. मे महिन्यात किरकोळ चलनवाढ ४% जवळपास राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्याजदरात वाढ होण्याची शक्यता नाही. रेपो दरात वाढ झाल्यामुळे बँका...

Mankind फार्मावर आयकर विभागाची छापेमारी

देशांतर्गत बाजारात यशस्वी स्टॉक लिस्टिंगच्या तिसऱ्या दिवशी मॅनकाइंड फार्मा अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. करचुकवेगिरीच्या आरोपावरून प्राप्तिकर विभागाने आज देशातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी मॅनकाइंड फार्माच्या कार्यालयात झडती घेतली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभाग दिल्ली आणि आसपासच्या भागात कंपनीच्या परिसराची झडती घेत असून कागदपत्रांची तपासणी केली जात असताना लोकांचीही चौकशी करत आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवारी स्टॉक...

डी नीर्स टूल्स IPO

De Neers Tools चा IPO २८ एप्रिल रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुंतवणूकदारांना ३ मे २०२३ पर्यंत या IPO चे सब्सक्रिप्शन घेण्याची संधी असेल. कंपनीने IPO साठी ९५ रुपये ते १०१ रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. या खरेदीसाठी dmat खाते असणे बंधनकारक असून अधिक माहितीसाठी आमच्याशी केव्हाही संपर्क करावा अशी विनंती आहे !!

एव्हलॉन टेक्नॉलॉजीज – शेअर्सचे लिस्टींग

एव्हलॉन टेक्नॉलॉजीज या इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा पुरविणाऱ्या आघाडीच्या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टींग मंगळवारी निराशाजनक झाले. आयपीओमधील ४३६ रुपयांच्या प्रती शेअर्स किमतीच्या तुलनेत शेअर्सचे लिस्टींग ४३१ रुपयांवर झाले. याचा अर्थ आयपीओ गुंतवणूकदारांना लिस्टिंगमध्येच १.१५ टक्क्यांनी तोटा झाला. या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आयपीओ ओव्हरसबस्क्राइब झाला होता. परंतु केवळ पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIBs) राखीव असलेला भाग पूर्णपणे भरला होता. सध्या शेअर्स...

रिझर्व्ह बँकेचा दिलासा

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देशातील कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे निकाल जाहीर करताना आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी धोरण दरात म्हणजेच रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. यासह केंद्रीय बँकेचा रेपो दर ६.५०% वर कायम ठेवण्यात आला आहे. कर्जदार कर्जाची मुदत वाढवण्याच्या आणि वाढत्या व्याजदरांच्या...

मॅनकाइंड फार्मा आपला आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत

कंडोम आणि प्रेग्नेंसी किट बनवणारी कंपनी मॅनकाइंड फार्मा आपला आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा आयपीओ ४२००-४७०० कोटी रुपयांचा असू शकतो. हा आयपीओ आल्यास ग्लँड फार्मा आयपीओ नंतरचा दुसरा सर्वात मोठा फार्मा आयपीओ असेल. नोव्हेंबर २०२० मध्ये ग्लँड फार्माचा रु. ६,४८० कोटी रुपयांचा आला होता. मॅनकाइंड फार्माने सप्टेंबर २०२२ मध्ये सेबीकडे आयपीओसाठी अर्ज दाखल केला होता. मॅनकाइंड फार्मा प्रिस्क्रिप्शन औषधे,...

आय. पि. .ओ./एन.एफ.ओ.

एन. एफ. ओ. म्हणजे... हि सर्वोत्तम संधि आहे सामान्य माणसासाठी गुंतवणूक करण्याची. मार्केटमधील #१ चे एन. एफ. ओ. व त्यांच्या इत्यंभूत माहितीसाठी इथे क्लिक करा!

0% व्याज???

हो शक्य आहे! आपल्या कुठल्याही दीर्घ मुदतीच्या कर्जावर ०% व्याज मिळवणे शक्य आहे. तेही केवळ नियोजनातून. ही काही मार्केटिंगची स्किम नाही. अधिक माहितीसाठी वाचा...

टॉप १० म्युच्युअल फंड

कुठले आहेत भारतातील सर्वात उत्तम रिटर्न देणारे म्युच्युअल फंड. खरंच सुरक्षीत आहेत का? कितपत परतावा खरंच मिळाला गुंतवणूकधारकांना? जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा!

काय करू नये?

शेअरमार्केट असो व म्युचुअल फंड, सोने असो वा गुंतवणूक, माणूस काहीना ना काही चूक करतोच आणि मग पश्चाताप करायची वेळ येते. वाचा अशा ५० चुका ज्या तुम्ही निश्चयाने टाळू शकाल!

आदर्श पोर्टफोलीओ

कसा असावा पोर्टफोलिओ? नक्की कुठल्या सेगमेंटचे शेअर घ्यावे व किती? काय असतो रिस्क रिवार्ड रेशो? जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा!

गुंतवणुकीचे विवीध पर्याय...

अल्पबचत योजना

बॅक किंवा पोस्ट खात्यामधील गुंतवणूकी ह्या सदरात मोडतात. ह्यामागे सरकारी संरक्षण असते. यामुळे रोख व सुरक्षितता दोन्ही प्राप्त होते. दर महिन्याला किंवा एका मुदतीनंतर ठरावीक रक्कम मिळू शकते.

सिस्टिमॅटिक इनवेस्टमेंट प्लान

ही अतिशय सोपी व शिस्तबध्दरीत्या पैसा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची पध्दत आहे. दीर्घावधीत भरपूर पैसा जमविण्यासाठी ही योजना चांगली असते. एकदम गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा अशा प्रकारे गुंतवणूक केली असता अतिशय चांगले परतावे प्राप्त होतात. बाजारातील चढ उतारांवर दुर्लक्ष करून अशा योजना प्रत्येक महिन्यात युनिट खरेदी तुम्हाला करू देतात.

शेअर मार्केट

आशियातील सर्वात जुने "बॉम्बे स्टॉक एक्सचेंज" हे भारतातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज असून, व्यवहारांच्या संख्येनुसार हे जगातील तिसरे मोठे एक्सचेंज आहे. येथे रोखांच्या संबंधात खरेदी-विक्री तसेच यांना पूरक असे व्यवहार चालतात.

सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लान

निवृत्त लोक किंवा ज्यांना दरमहा खर्चासाठी काही रक्कम कायमस्वरूपी आवश्यक आहे अश्या गृहिणी किंवा तत्सम लोकांसाठी ही एक चांगली योजना आहे. व्याजाशिवाय मूळ रक्कमेमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ होत असते व हाच ह्या योजनेचा मुख्य फायदा आहे. असे फंड १२% पेक्षाही जास्त परतावा देतात!!

म्युच्युअल फंड

म्युचुअल फंड म्हणजे तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्त्रोत जो एखाद्या गुंतवणूकदारांच्या समूहाकडून आलेला असतो. म्युचुअल फंडात गुंतवणूकीचे विकेंद्रिकरण करता येते व जोखीम देखील कमी होते.

जीवन विमा

तुमच्या जीवनाच्या व संपत्तीच्या बाबतीतील पुष्कळसे धोके हे जीवनविमा प्रकारात संरक्षित केल्या जातात. भारतीय जीवन विमा निगम आणि काही चांगल्या स्किम्सविषयी...

युटिआय : भारत सरकारचा उपक्रम

भारतीय म्युचुअल फंड हा भारत सरकारचा उपक्रम असून ह्याची सुरूवात भारतात १९६४ साली “युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया” ह्या कंपनिच्या स्थापनेपासून झाली. ५० वर्षांहून अधिक जुनी असलेली ही भारताची अग्रगण्य म्युचुअल फंड संस्था असून ह्याचे नियंत्रण “यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया एक्ट, १९६३” ह्या स्वतंत्र कायद्यांतर्गत केले जाते. सन १९८७ पर्यंत खासगी/इतर कंपन्यांना म्युचुअल फंड व्यवसायाची परवानगी नव्हती, तेव्हा युटिआय हा एकमेव पर्याय होता. सेबी ने १९९३ साली बनवलेल्या “म्युचुअल फंड फ्रेमवर्क” नंतर अनेक खासगी व सरकारी म्युचुअल फंड कंपन्यांनी ह्या व्यवसायात पदार्पण केले. तरी आजही युटिआयच्या विवीध योजना लोकांच्या मनावर साम्राज्य गाजवत आहेत.

बाल भविष्य योजना

आपल्या मुलांचे शिक्षणरुपी भविष्य पूर्ण करण्यासाठी आपल्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी जास्त पैसा लागू शकतो. किशोर वयापासूनच या योजनेद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.

सेवा निवृत्ती पेंशन योजना

दरमहा रु. ५०० भरून कुणीही "सेवा निवृत्ती" नियोजन करू शकतो. सदरील योजने अंतर्गत परताव्याचा व्याजदर हा साधारणत:११% पेक्षा जास्त (चक्रवाढीसह) मिळू शकतो, शिवाय ८०सी अंतर्गत कर-सवलत मिळते.

करबचत योजना

आजकाल नोकरदार वर्गातील लोकसुध्दा भरघोस पगारामुळे प्राप्तिकर (Income Tax) साठी पात्र होऊ शकतात. म्युचुअल फंडातील नाविन्यपूर्ण ELSS योजना भरघोस परताव्यासह टॅक्स बचतही करून देतात.

युनिट लिंक्ड इंशुरन्स योजना

ज्यांना जीवन विमा संरक्षणासह भांडवल वृध्दिचाही लाभ अपेक्षित आहे अशा सर्वांसाठी ही अत्यंत सुंदर अशी योजना आहे. या योजनेसाठी वैद्यकीय तपासणीची गरज भासत नाही. परतावा पूर्णतः टॅक्सफ्री आहे.

शेअरखान : सर्वात विश्वासार्ह ब्रोकर!

  • सन 2000 पासून भारतामधे सुरु झालेली ब्रोकिंग फर्म.
  • BNP PARIBAS तर्फे चालविण्यात येणारी शेअर ट्रेडिंगसाठी प्रसिध्द व विश्वसनीय ब्रोकिंग फर्म
  • Fundamental Research व Technical Research
  • मुलभूत सुविधांची Online व Offline प्रशिक्षणाचीही मोफत सोय.
  • भारतातील ६०० पेक्षा जास्त शहरामधून २५०० पेक्षा जास्त शाखा.

Equity

F & O

M. F.

Currency

Comodity

शेअरखान अकाउंट ५ प्रकारच्या सुविधा देते

  1. Online Trading – www.sharekhan.co
  2. Trade Tiger – दैनंदिन ट्रेडर “ट्रेड टायगर” टर्मिनल व्दारेही खरेदी विक्री करू शकतात.
  3. शेअरखानच्या नजीकच्या कोणत्याही कार्यालयात जाऊन आपण शेअर्सची खरेदी विक्री करू शकता.
  4. Dial & Trade : 1800 22 7050 for Equity, 1800 22 7004 for Commodity
  5. Relationship Manager – आपली गुंतवणूक रु. ५ लाख पेक्षा जास्त असेल तर रिलेशनशिप मनेजर व्दारे मोफत गुंतवणूक सल्लाही मिळतो.

प्रदीप जोशी, फायनान्स कन्सलटंट

कार्यकुशल अभियंता आणिक तत्पर जो अधिकारी,
अर्थकारणी सहज ज्याची बुद्धी घेत भरारी,
बुध्दीबळाच्या सामर्थ्याने उधळी शत्रूचे डाव,
अष्टपैलू जणू हिरा असा जो : ‘प्रदीप’ त्याचे नाव!

“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली.

NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे. क्रमश:

अर्थतज्ञ जोशी सरांच्या गुंतवणूक टीप्स!

  • गुंतवण्यापूर्वी स्पष्ट व योग्य असे गुंतवणूक लक्ष तयार करा.
  • कुठल्याही गुंतवणुकीत जोखीम असतेच, जसा नफा वाढतो, तशी जोखीम देखील वाढत जाते. जोखीम कमी करण्यासाठी आपल्या गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण करा.
  • ऋणरोखे, शेअर व रोख यांचा योग्य समन्वय आपल्या गुंतवणुकीत करा.
  • तुमच्या ज्ञानाच्या मर्यादा ओळखा. जे तुम्हाला समजले नसेल, असा प्रकारांमधे गुंतवणूक करू नका.
  • अभ्यासपूर्वक गुंतवणूक करा. तुम्ही निश्चित करा कशात गुंतविता आहात व त्याचा परिणाम जोखीम, परतावे व तुमच्या गुंतवणुकीवर कसा होणार आहे.
  • कुठलेही गुंतवणुकीचे निर्णय घेताना हे लक्षात ठेवा की, तुम्हाला गुंतवणुकीवर आयकर द्यावा लागणार आहे.
  • कुठल्याही अफवा किंवा सल्ल्यांवर गुंतवणूक करू नका. हे प्रत्येक वेळेला बरोबरच राहील असे आवश्यक नाही.
  • जर तुम्हाला एखादी गुंतवणूक पटत नसेल, तर तुमच्या आर्थिक तज्ञांना नाही म्हणतांना संकोचु नका. 
  • आपली जोखीम क्षमता ओळखा.

फ्युचर्स आणि ऑप्शन्स

कमित कमी गुंतवणूकIवर व कमी टॅक्स भरून अधिक लवकर फायदा मिळवायचा असेल तर “फ्युचर्स आणि ऑप्शन्स” चा पर्याय आहे. काही लोकांनी जरी ह्याला सट्टा म्हटले तरी प्रत्यक्ष तसे नाहि. अभ्यासपूर्ण गुंतवणूक व लक्षपूर्वक नियोजन केल्यास F&O चांगले उत्पन्न देऊ शकते. एक महत्वाची गोष्ट म्हणजे दर महिन्याला F&O ची मासीक एक्सापायरी. त्यामुळे खूप लांबचे प्लानिंग करण्यापेक्षा ताज्या घडामोडींवर लक्ष ठेऊन गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो, तोदेखील महीन्याभरात.

अफलातून वेगळ्या योजना!

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची अप्रतिम योजना आहे, ज्या अंतर्गत मुलीचे उच्च शिक्षण व भविष्य घडवण्यासाठी विशेष अनुदान मिळते.

राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना सन २००८ पासून सुरु झाली असून केंद्र सरकार सन २०१७/२०१८ पर्यंत काही रक्कम प्रोत्साहन म्हणून हे खाते उघडणाऱ्या व्यक्तीला देणार आहे.

LIC (Life Insurance Corporation of India) तर्फे मुलींसाठी कन्यादान योजनासुद्धा अत्यंत आकर्षक स्वरूपात सुरु आहे. मुलगी लहान असल्यापासून गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होतो.

म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करून मिळणारा डीव्हिडंड कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी सामना करणाऱ्या संस्थेकडे वर्ग करण्याची सोय सुध्दा म्युचुअल फंडातर्फे केली आहे.